आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिका-चीन व्यापारी युद्धाचा भारताला फायदा : अर्थमंत्री जेटली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- अमेरिका आणि चीन यांच्या तसेच इतर देशांमध्ये सुरू असलेल्या व्यापारी युद्धामुळे सुरुवातीच्या काळात अस्थिरता निर्माण होऊ शकते, मात्र यामुळे भारताला मोठी संधी मिळण्याची शक्यता असल्याचे मत अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केले आहे. यामुळे व्यापारी आणि निर्मिती क्षेत्राचे केंद्र बनण्यासाठी भारताला मदत होणार असल्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. 


पीएचडी चेंबर ऑफ कॉमर्सच्या वार्षिक संमेलनात जेटली यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शुक्रवारी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, "काही जागतिक घटना भारतावर विपरीत परिणाम करतात, मात्र या घटना तेजीने पुढे जाण्यासाठी अनेक मार्गदेखील खुले करत आहेत. एखादे आव्हान आपल्यासाठी कधी संधी बनेल, आपल्याला यावर बारीक लक्ष ठेवावे लागणार आहे.' 


अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेल्या व्यापार युद्धामुळे भारतात तयार होणाऱ्या मशिनरी, इलेक्ट्रिक उपकरणे, वाहने आणि वाहनांचे सुटे भाग, रसायने, प्लास्टिक आणि रबराची उत्पादने अमेरिकी बाजारात स्पर्धा देण्यास सक्षम होण्याची शक्यता असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. 


व्यापाऱ्यांनी स्वच्छ पारदर्शी आणि नैतिक व्यापारी धोरणांचा अवलंब करावा, असे आवाहनही जेटली यांनी केले. उद्योजकांनी त्यांच्या वाटेवर येत असलेला पूर्ण कर भरण्याचेही त्यांनी आवाहन केले. आयबीसी कायद्यामुळे रात्रीतून भारतातून पळून जाणाऱ्या कर्जदारांवर अंकुश लावला आहे. त्यामुळे आता जो बँकांकडून कर्ज घेईल, त्याला ते फेडावेच लागणार असल्याचे जेटली म्हणाले. 

बातम्या आणखी आहेत...