आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India Have Chance To Take Big Lead In Test Against Australia

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अखेरच्या कसोटीत भारताला मोठ्या आघाडीची संधी, ऑस्ट्रेलिया 386 धावांनी पिछाडीवर, 6 फलंदाज परतले तंबूत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी - मालिकेतील चौथ्या आणि अखेरच्या कसोटीत तिसरा दिवसही भारतासाठी चांगला राहिला. पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी चांगली फलंदाजी केली. पण त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कमाल दाखवली आणि ऑस्ट्रेलियाच्या सहा फलंदाजांना परतीचा मार्ग दाखवला. दिवसअखेर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 6 बाद 236 अशी झाली. अजूनही ते भारतापेक्षा 386 धावांनी पिछाडीवर आहेत. 


दुसऱ्या दिवसाच्या खेळाच्या सुरुवातीला पहिल्या सत्रात हॅरिस आणि ख्वाजा यांनी चांगली फलंदाजी केली. त्यातही ख्वाजा लवकर बाद झाला. पण हॅरीसने अर्धशतक झळकावले. 79 धावांवर बाद झाल्याने त्याचे शतक हुकले. त्यानंतर मात्र ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना भारतीय गोलंदाजांनी सेट होऊ दिले नाही. खेळ कांगारुंच्या सहा फलंदाजांना तंबूत परतवण्यात भारतीय गोलंदाजांना यश मिळाले. शेवटच्या सत्रात कमी प्रकाशामुळे सामना थांबवावा लागला. त्यानंतर पावसामुळे दिवसाचा उर्वरीत म्हणजे जवळपास 17 षटकांचा खेळ रद्द झाला. हा खेळ जाला असता तर कदाचित ऑस्ट्रेलियाचा डाव भारतीय गोलंदाजांनी आणखी मोडीत काढला असता. आता चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव लवकरात लवकर गुंडाळून कांगारुंना फॉलोऑन द्यायचा भारताचा प्रयत्न असेल. 


फिरकीपटुंची चलती 
भारताच्या फिरकीपटुंनी ऑस्ट्रेलियाच्या सहापैकी पाच विकेट्स काढल्या. कुलदीप यादवने तीन तर जडेजाने दोन फलंदाज बाद केले. तर मोहम्मद शमीने एक विकेट मिळवली.