आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताने 22 महिन्यांपासून नाही गमावले सलग दाेन T-20 सामने: अाज भारतासाठीचा निर्णायक सामना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

> भारत-अाॅस्ट्रेलिया सामना; प्रक्षेपण दु. 1:20 वाजेपासून  

 

 

मेलबर्न - भारत अाणि यजमान अाॅस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा टी-२० सामना अाज शुक्रवारी मेलबर्नच्या मैदानावर रंगणार अाहे. विजयी सलामीने अात्मविश्वास द्विगुणित झालेल्या अाॅस्ट्रेलिया संघाची नजर अाता मालिका जिंकण्याकडे लागली अाहे. सलामीच्या पराभवाने अडणचीत सापडलेल्या टीम इंडियासाठी ही निर्णायक लढत अाहे. यातील पराभवाने टीमवर मालिका गमावण्याची नामुष्की अाेढवेल. त्यामुळे  दुसऱ्या टी-२० सामन्यात बाजी मारण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल.

  
मागील २२ महिन्यांपासून भारताने सलग दाेन टी-२० सामने गमावलेले नाही. त्यामुळेच अाता या माेठ्या मैदानावर अव्वल कामगिरी करण्याचा भारतीय संघाचा मानस अाहे. यासाठी कर्णधार विराट काेहली  या सामन्यासाठी तीन फिरकीपटूंची मदत घेऊ शकेल. पावसामुळे टीमला सलामीचा सामना गमवावा लागला.  


विंडीजविरुद्धच्या तीन मालिका विजयाने भारतीय संघ जबरदस्त फाॅर्मात हाेता. मात्र, भारताच्या याच विजयी माेहिमेला कांगारूंनी ब्रेक लावला. यजमान अाॅस्ट्रेलियाच्या गाेलंदाजांनी घरच्या मैदानावर सरस खेळी करताना भारताला राेखले.

 

लाेकेश राहुल ठरताेय भारतासाठी डाेकेदुखी 
टीम इंडियासाठी युवा फलंदाज लाेकेश राहुल हा काहीसा डाेकेदुखीच ठरत अाहे. त्याने गत सामन्यात तिसऱ्या स्थानावरून फलंदाजी करताना अवघ्या १३ धावांची खेळी केली. ताे मागील सहा सामन्यांत ३० धावांचा अाकडा पार करू शकला नाही. तसेच सलामीच्या सामन्यात सलामीवीर राेहित शर्मानेही निराशा केली. मात्र, अाता त्याच्याकडून दुसऱ्या सामन्यात माेठी खेळीची अाशा अाहे. त्याच्या माेठ्या खेळीमुळे भारतीय संघाला बाजी मारून मालिकेत बराेबरी साधता येईल. तसेच विराट काेहलीही झंझावाती खेळीसाठी उत्सुक अाहे. 


संभाव्य संघ  
- भारत : विराट काेहली (कर्णधार), शिखर धवन, राेहित शर्मा, लाेकेश राहुल, मनीष पांडे, श्रेयस अय्यर, दिनेश कार्तिक, ऋषभ पंत, क्रुणाल, यजुवेंद्र चहल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, खलील अहमद, वाॅशिंग्टन सुंदर.  

- अाॅस्ट्रेलिया : अॅराेन फिंच (कर्णधार), अॅस्टाेन एगर, अॅलेक्स केरी, नॅथन कुल्टर, क्रिस, बेन मॅडेमाेट, ग्लेन मॅक्सवेल, डी अार्सी शाॅर्ट, बिली स्टाॅनलेक, स्टाेईनिस, टाये, अॅडम झम्पा.

 

बातम्या आणखी आहेत...