आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई - ऑस्ट्रेलियाचा फाॅर्मात असलेला कर्णधार अॅराेन फिंच (११०) आणि डेव्हिड वाॅर्नर (१२८) यांनी अभेद्य द्विशतकी भागीदारीच्या बळावर भारतात विजयाने पंतगाेत्सव साजरा केला. दुसरीकडे सुमार खेळीमुळे यजमान भारतीय संघावर आपल्या घरच्या मैदानावर संक्रांत आली. पाहुण्या ऑस्ट्रेलियाच्या संघाने सलामीच्या वनडे सामन्यात भारतावर १० गड्यांनी दणदणीत विजयाची नाेंद केली. यासह ऑस्ट्रेलियाच्या संघाला १४ वर्षांनंतर भारतावर सलग चाैथ्या वनडेत मात करता आली. यापूर्वी गतवर्षी तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला हाेता. तसेच, भारताला पाचव्यांदा १० गड्यांनी पराभव पत्करावा लागला. ऑस्ट्रेलियाच्या टीमने पहिल्यांदाच भारतावर १० गड्यांनी मात केली आहे.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गाेलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार अॅराेन फिंचचा हा निर्णय मिशेल स्टार्क (३/५६), कमिन्स (२/४४) आणि रिचर्डसनने (२/४३) याेग्य ठरला. त्यांनी धारदार गाेलदंाजीच्या बळावर प्रथम फलंदाजी करणाऱ्या भारतीय संघाला ४९.१ षटकांत अवघ्या २५५ धावांवर राेखले. आवाक्यातले विजयाचे लक्ष्य वाॅर्नर आणि फिंचने ३७.४ षटकांत गाठले. यासह टीमने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत विजयी सलामी दिली. तसेच, मालिकेत १-० ने आघाडी घेतली. आता मालिकेतील दुसरा वनडे सामना शुक्रवारी राजकाेटच्या मैदानावर हाेणार आहे.
सहाव्यांदा भारतविरुद्ध सलामीच्या जाेडीचे शतक नाेंद
भारतीय संघाविरुद्ध सहाव्यांदा प्रतिस्पर्धी टीमच्या सलामीवीरांनी प्रत्येकी एक वैयक्तिक शतक साजरे केले आहे. आता ऑस्ट्रेलियाच्या डेव्हिड व फिंचने हा पराक्रम गाजवला. यापूर्वी आफ्रिकेच्या डिकाॅक व आमलाने २००३ मध्ये गाजवला हाेता. यापूर्वी १९८६ मध्ये जेफ मार्श (१०४) आणि डेव्हिड बुनने (१११) धावांची खेळी केली हाेती.
डेव्हिड वाॅर्नरच्या वेगवान पाच हजार धावा पूर्ण
ऑस्ट्रेलियन संघाच्या सलामीवीर डेव्हिड वाॅर्नरने सलामीच्या वनडेत नाबाद शतक झळकावले. यासह त्याने वनडेत वेगवान पाच हजार धावांचा पल्ला गाठला. अशी कामगिरी करणारा ताे पहिला ऑस्ट्रेलियन फलंदाज ठरला. त्याने ११५ डावांत हा पराक्रम गाजवला. यापूर्वी डिन जाेन्स यांनी १२८ डावांत हे यश संपादन केले हाेते.
झंम्पाकडून चाैथ्यांदा काेहलीची विकेट
ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या लेग स्पिनर अॅडम झंम्पाने वनडेमध्ये चाैथ्यांदा टीम इंडियाच्या विराट काेहलीची विकेट काढली. याशिवाय इंग्लंडच्या स्वान, श्रीलंकेच्या सुरज रणदीवनेही प्रत्येकी चार वेळा काेहलीची विकेट घेतली आहे. आता ऑस्ट्रेलियाच्या स्टार्क व पॅट कमिन्सने निम्मा संघ पॅव्हेलियनमध्ये पाठवला. यात स्टार्कने भेदक मारा करताना तीन विकेट घेतल्या. तसेच पॅट कमिन्सने १० षटकांत ४४ धावा देऊन दाेन विकेट घेतल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.