आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इराणकडून तेल खरेदीबाबत निर्णय घेण्यास भारत स्वतंत्र; उभय देशांत उद्या चर्चा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली- इराणकडून तेल आयात करण्याबाबतचा निर्णय घेण्यास भारत स्वतंत्र आहे. त्याबाबत इतर कोणाचाही दबाव चालणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. गुरुवारी दोन्ही देशांचे परराष्ट्रमंत्री तसेच संरक्षणमंत्री स्तरावर थेट संवाद होणार आहे. या बैठकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. 


भारत व अमेरिका यांच्यात टू प्लस टू बैठकीवरून कूटनीतीच्या क्षेत्रात उत्सुकता वाढली आहे. त्या पार्श्वभूमीवर सरकारचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, इराणवर अमेरिकेने प्रतिबंध लादले आहेत. खरे तर भारताला २५ टक्के तेल इराणमधून आयात करावे लागते. हिंद-प्रशांत क्षेत्रात भारताला सशक्त पाहण्याची अमेरिकेची इच्छा आहे. म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेवर दबाव येणार नाही, याची काळजी अमेरिकेने घेणे योग्य ठरेल, असे जाणकारांना वाटते. त्यामुळे या प्रकरणातील सर्व निर्णय घेण्यास भारत स्वतंत्र आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व संरक्षणमंत्री निर्मला सीतारमण यांनी अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पॉम्पिआे तथा संरक्षणमंत्री जेम्स मॅटिस यांच्यासोबत द्विपक्षीय मुद्द्यांवर गुरुवारी चर्चा होणार आहे. पॉम्पिआे तसेच मॅटिस व अमेरिकेच्या सैन्य दलाच्या प्रमुख समित्यांचे अध्यक्षही बुधवारी सायंकाळी नवी दिल्लीला दाखल होतील. 


पॉम्पिआे दिल्लीहून पाकिस्तानला रवाना होतील. पाकिस्तानात पंतप्रधान इम्रान खान यांच्या नेतृत्वाखालील सरकार आल्यापासून अमेरिका तसेच पाकिस्तान यांच्यातील हा पहिलाच उच्चस्तरीय संपर्क ठरणार आहे. पाकिस्तान अमेरिकेच्या अधिकाऱ्यांशी व सरकारचे प्रतिनिधी अमेरिकेशी काही संवाद साधतील, हे जाणून घेण्यास भारत उत्सुक आहे. 


भारत-अमेरिकेत सुरू होणार नवा व्यापारी मार्ग : टू प्लस टू बैठकीत दोन्ही देशांत संरक्षण क्षेत्रातील संयुक्त रूपाने उच्च तंत्रज्ञानाचा वापर करून नवा व्यापारी मार्ग सुरू होणार आहे. प्रशांत-हिंद क्षेत्रात सर्वसमावेशी, सुरक्षित तसेच शांततापूर्ण मार्ग अशी या प्रकल्पाची चर्चा होत आहे. त्याशिवाय मेक इन इंडिया अंतर्गत भारतात निर्माण होणाऱ्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्याबाबत बैठकीत सहमती होऊ शकते. अॅल्युमिनियमसारख्या काही वस्तूंवरील शुल्काचा मुद्दाही व्यापारी चर्चेत समाविष्ट केला जाऊ शकतो. 


चाबहार, अफगाण सीमेचाही मुद्दा 
भारत-अमेरिकेच्या टू प्लस टू चर्चेदरम्यान इराणमधील भारताच्या सामरिकदृष्ट्या महत्त्वाच्या चाबहार बंदराचा मुद्दा व त्यासंदर्भातील भारताच्या चिंता मांडल्या जाऊ शकतात. त्याशिवाय अफगाणिस्तान सीमेवरील सद्य:स्थितीबद्दलही उभय देशांच्या परराष्ट्रमंत्री तसेच संरक्षणमंत्र्यांत चर्चा होणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...