आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Is The First Country To Announce The Seventh Consecutive Innings In A Test

भारत कसोटीत सलग सातवा डाव घोषित करणारा जगातील पहिला देश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोलकाता : गुलाबी चेंडूवर आपली पहिली कसोटी खेळत असलेला भारताने दिवस-रात्र कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारताने ९ बाद ३४७ धावांवर डाव घोषित केला. भारताने २४१ धावांनी आघाडी घेतली होती. भारत सलग सातव्यांदा डाव घोषित करणारा पहिला संघ बनला. यापूर्वी, इंग्लंडने २००९ मध्ये सलग ६ डाव घोषित केले होते.

- इंग्लंडने २००९ मध्ये सलग ६ डाव घोषित केेले
- कोहली (१३६), रहाणेने (५१) ९९ धावा जोडल्या

दुसऱ्या दिवसअखेर बांगलादेशने दुसऱ्या डावात ५ बाद १५१ धावा काढल्या. मुशफिकुर रहीम (५९*) खेळतोय. तैजुल इस्लाम ११ धावांवर परतला. बांगलादेशने १३ धावांत ४ गडी गमावले. संघाच्या ८२ धावा असताना महमुदुल्ला (३९*) रिटायर्ड हर्ट झाला.

यापूर्वी, भारतीय संघाने ३ बाद १७४ धावांच्या पुढे खेळताना कर्णधार कोहली व रहाणेने (५१)चौथ्या गड्यासाठी ९९ धावांची भागीदारी रचली. या दोघांची चौथ्या विकेटसाठी एकूण ४२ डावांत ६९.०७ च्या सरासरीने २७६३ धावा केल्या. चौथ्या गड्यासाठी भागीदारीत ही जोडी दुसऱ्या स्थानावर आहे. विराटने १९४ चेंडूंवर १८ चौकारांसह १३६ धावा काढल्या. भारताने ९ बाद ३४७ धावांवर डाव घोषित केला.

कोहली कर्णधार म्हणून कसोटीत अधिक शतकांबाबत दुसऱ्या स्थानी
 

खेळाडू : देश : शतक


ग्रीम स्मिथ : द. अफ्रीका : २५
कोहली : भारत : २०
पॉटिंग : ऑस्ट्रेलिया : १९


कर्णधार म्हणून आंतरराष्ट्रीय शतकात कोहलीची रिकी पॉटिंगशी बरोबरी
खेळाडू : शतक :
डाव


कोहली : ४१ : १८८
पॉटिंग : ४१ : ३७६
ग्रीम स्मिथ : ३३ : ३६८
स्टीव स्मिथ : २० : ११८

विराट कोहली दिवस-रात्र कसोटीत शतक करणारा पाचवा कर्णधार
 

कर्णधार : देश : धावा
 
कोहली : भारत : १३६
रूट : इंग्लंड : १३६
स्मिथ : ऑस्ट्रेलिया : १३०
प्लेसिस : द. अफ्रीका : ११८
विलियम्सन : न्यूझीलंड : १०२

कोहलीने २३ नोव्हेंबर रोजी प्रथम श्रेणीत पदार्पण केले


कोहली आणि ईशांत या दोघांनी दिल्लीकडून आजच्याच दिवशी २३ नाेव्हेंबर रोजी २००६ मध्ये प्रथम श्रेणीत पदार्पण केले होते. कोहली दिवस-रात्र कसोटीत शतक झळकावणारा पहिला भारतीय फलंदाज बनला. दुसरीकडे, ईशांत शर्माने गुलाबी चेंडूवर पहिल्याच सामन्यात ५ बळी घेणारा भारताचा पहिला गोलंदाज ठरला.


कोहलीचे ७० वे आंतरराष्ट्रीय शतक, तो शतकाच्या बाबतीत सचिन (१००) व पॉटिंग (७१) नंतर तिसरा.
मोमिनुल हक एका कसोटीत दोन्ही डावांत शून्यावर बाद होणारा पहिला कर्णधार बनला आहे.


धावफलक - नाणेफेक बांगलादेश (फलंदाजी)
बांगलादेश पहिला डाव १०६ धावा.
भारत कालच्या ३ बाद १७४ धावांच्या प
ुढे.


भारत (पहिला डाव) : धावा : चेंडू : ४ : ६
काेहली झे. तैजुल गो. इबादत : १३६ : १९४ : १८ : ०
रहाणे झे. इबादत गो. तैजुल : ५१ : ६९ : ०७ : ०
जडेजा त्रि. अबु जायेद : १२ : ४१ : ०० : ०
वृद्धीमान साहा नाबाद : १७ : ४१ : ०२ : ०
अश्विन पायचित गो. अल अमिन : ०९ : २१ : ०२ : ०
यादव झे. शदमान गो. अबु जायेद : ०० : ०३ : ०० : ०
इशांत पायचित गो. अल अमिन : ०० : ०३ : ०० : ०
मो. शमी नाबाद : १० : ०५ : ०१ : १

अवांतर : २२. एकूण : ८९.४ षटकांत ९ बाद ३४७ धावा. 

गडी बाद क्रम : १-२६, २-४३, ३-१३७, ४-२३६, ५-२८९, ६-३०८, ७-३२९, ८-३३०, ९-३३१. 

गाेलंदाजी : अल अमिन २२.४-३-८५-३, जायेद २१-६-७७-२, इबादत हुसैन २१-३-९१-३, तैजुऊल २५-२-८०-१.

बांगलादेश (दुसरा डाव) : धावा : चेंडू : ४ : ६


शदमान पायचित गो. शर्मा : ०० : ०५ : ०० : ०
कायेस झे. कोहली गो. शर्मा : ०५ : १५ : ०० : ०
माेमिनुल यष्टी. साहा गो. शर्मा : ०० : ०६ : ०० : ०
मिथून झे. शमी गो. यादव : ०६ : १२ : ०० : ०
मुशफिकूर नाबाद : ५९ : ७० : १० : ०
महमुद्दुल्लाह रिटायर्ट हर्ट : ३९ : ४१ : ०७ : ०
मेंहदी झे. कोहली गो. शर्मा : १५ : २२ : ०२ : ०
तैजुल झे. रहाणे गो. यादव : ११ : २४ : ०१ : ००

अवांतर : १७. एकूण : ३०.४ षटकांत ५ बाद १५१
 

धावा. गडी बाद : १-०, २-२, ३-९, ४-१३, ५-८२, ६-१५२.

गाेलंदाजी : इशांत ९-१-३९-४, उमेश १०.३-०-४०-१, शमी ८-०-४२-०, अश्विन ५-०-१९-०.