आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरच्या मैदानावर सलग अकरा कसोटी मालिका जिंकणारा भारत पहिला देश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे : दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने द. आफ्रिकेचा एक डाव आणि १३७ धावांनी दणदणीत पराभव केला. तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने २-० विजयी आघाडी घेतली आहे. देशातील मैदानावर सलग ११ कसोटी मालिका जिंकणारा भारत जगातील पहिला देश ठरला. यापूर्वी ऑस्ट्रेलियाने दोन वेळा १०-१० मालिका जिंकल्या होत्या.

२०१३ आतापर्यंत भारताने देशात ३१ सामने खेळले, यात २५ विजय, केवळ १ पराभव, ५ ड्रॉ

यातील ८ मालिकांत कोहली कर्णधार. २ धोनी तर १ राहणेच्या कर्णधारपदाखाली जिंकल्या.

भारताचा द. आफ्रिकेवर कसोटीत सर्वात मोठा विजय
यापूर्वी २०१० मध्ये द. आफ्रिकेला एक डाव व ५७ धावांनी हरवले होते. २०१० नंतर आफ्रिका कधीच एक डावाने हरला नव्हता.

रायगड पाहण्यासाठी विराट काेहली खास येणार
शिवाजी महाराज सर्वांसाठीच प्रेरणास्थान अाहेत. महाराजांनी ज्या िकल्ल्ल्यांवरून मोहिमा गाजवल्या त्या किल्ल्यांचे मला दर्शन घ्यायचे अाहे, असे टीम इंडियाचा कर्णधार विराट काेहलीने म्हटले आहे. खास करून रायगडच्या किल्ल्याला भेट देण्यासाठी येणार असल्याचे काेहलीने खासदार संभाजीराजे यांच्याशी घेतलेल्या भेटीदरम्यान अावर्जून सांगितले.