आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्रोच्या गगनयानात जाणारे अंतराळवीर विनापाण्याच्या स्प्रेनेच अंघोळ करणार, असे करणारा भारत पहिला, नासानेही मागितले हे तंत्र

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : भारताची स्वदेशी बहुउद्देशीय मानवयुक्त अंतराळ मोहीम गगनयान डिसेंबर २०२१ मध्ये प्रक्षेपित होईल. यात इस्रो आणि आयआयटी दिल्ली नवीन प्रयोग करणार आहेत. यात जाणारे अंतराळवीर विनापाण्याच्या स्प्रेने अंघोळ करणार आहेत. आयआयटी दिल्ली आणि क्लेन्सटा इंटरनॅशनल या कंपनीने संयुक्तरीत्या हा स्प्रे तयार केला आहे. अंतराळात अंघोळीसाठी याचा वापर करणारा भारत हा पहिला देश असेल, कारण अमेरिकेची अंतराळ संस्था नासादेखील या तंत्राचा प्रयोग करत नाही. नासाही या तंत्राचा वापर करण्याबाबत इस्रोच्या संपर्कात आहे.


अंतराळात जाणाऱ्यांना यानातून कमीत कमी साहित्य न्यावे लागते. तेथे अंघोळीसाठी पुरेसे पाणी नसते. अंघोळ न केल्याने शरीरावर अनेक प्रकारचे जंतू येतात. अमेरिका, रशिया, चीनसारख्या काही देशांच्या अंतराळवीरांना अंघोळीसाठी विशिष्ट प्रकारचे पाणी वापरावे लागते. ए‌वढेच नव्हे तर त्यांना आपले मूत्र जमा करून विशिष्ट प्रक्रियाद्वारे रिसायकल करून त्याचा वापर करावा लागतो. पाणीविरहित स्प्रेने अंघोळीच्या तंत्रावर आयआयटी दिल्लीसोबत काम करणारे डॉ. पुनीत गुप्ता यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी माझ्या आईच्या पायाला जखम झाली होती. जखम चिघळू नये यासाठी डॉक्टरांनी जखमेला पाणी लागू न देण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे ती अनेक दिवस अंघोळीविना राहिली. त्यामुळे तिच्या केसांत आणि त्वचेला खाज सुटायची. तेथे पाणीविरहित बॉडी वॉश आणि पाणी नसणारा शॅम्पू बनवण्याची कल्पना सुचली. हे तंत्र विकसित केल्यानंतर २०१८ मध्ये त्यांनी स्टार्टअप सुरू केले.


आयआयटी दिल्लीसोबत इस्रोसाठी या प्रकल्पावर काम सुरू केले. तेव्हापासून आतापर्यंत सैन्यातील जवानांनी पाणीटंचाईच्या काळात याचा वापर केला आहे. आता या प्रकल्पाचा वापर एम्स रायपूरसह सुमारे २०० सरकारी रुग्णालयांत रुग्णांसाठी होत आहे. याच्या वापरानंतर शरीर जंतुविरहित होते.सहा महिन्यांपूर्वी आयआयटी दिल्लीतील एका कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीही या इनोव्हेशनचे कौतुक केले होते.

आयआयटी दिल्ली- इस्रोचा आता अंतराळ तंत्रज्ञान सेल
आयआयटी दिल्ली आणि इस्रो आता संयुक्तपणे अंतराळ तंत्रज्ञान सेल स्थापन करतील. आयआयटीचे संचालक रामगोपाळ राव यांनी शुक्रवारी याची घोषणा केली. ते म्हणाले, अंतराळातील संशोधन आणि आमचे तंत्रज्ञान इतर देशांना देण्यासाठी याची स्थापना होईल.
 

बातम्या आणखी आहेत...