टॅक्स / 11% कंपनी करासह भारत सर्वात कमी दरांच्या देशांत, जागतिक सरासरी 23%, आर्थिक मरगळीवर सर्जिकल स्ट्राइक

देशातील अव्वल 50 कंपन्यांना 46 हजार काेटी कमी कर द्यावा लागेल

वृत्तसंस्था

Sep 21,2019 09:56:30 AM IST

नवी दिल्ली - अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शुक्रवारी कंपनी कर दर ३०% वरून घटवून २२% केला आहे. यासाेबत भारत या प्रकरणात जगात सर्वात कमी कंपनी कर असणाऱ्या देशांत समाविष्ट झाला आहे. कंपनी कराची सध्याची जागतिक सरासरी २३.०३% आहे. भारतात सध्या प्रभावी कंपनी कर आता २५.१७% हाेईल. हा आधीच्या तुलनेत जवळपास १०% कमी आहे. यासाेबत निर्मितीमध्ये पाऊल ठेवणाऱ्या नव्या कंपन्यांना माेठा दिलासा दिला आहे. १ आॅक्टाेबर २०१९ पासून सुरू हाेणाऱ्या कंपन्यांना १५% कंपनी कर द्यावा लागेल. त्यासाठी प्रभावी दर १७.०१% असेल. यासाेबत कंपन्या काेणत्याही प्रकारची सूट अथवा टॅक्स इन्सेन्टिव्ह घेत नसेल तर त्यांना मिनिमम अल्टरनेट टॅक्स (मॅट) देण्यापासूनही दिलासा िदला आहे.


सरकारचे कंपनी कर कपातीचे पाऊल जगात जागतिकरणानंतर सुरू झालेला ट्रेंड दर्शवतो. जगातील अनेक महत्त्वाच्या देशांनी अर्थव्यवस्थेला तेजी देणे आणि एफडीआय- एफआयआयला प्रोत्साहन देण्यासाठी सतत कपात केली आहे. १९८० नंतर जगात सर्व देशांनी मिळून सरासरी कंपनी कर ३८.०३% होता. २०१८ मध्ये हा घटून २३.०३% झाला. म्हणजे ३८ वर्षांत १५% पेक्षा जास्त कपात झाली.


देशातील अव्वल 50 कंपन्यांना 46 हजार काेटी कमी कर द्यावा लागेल
अर्थव्यवस्थेला चालनना देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी महिनाभरात चाैथ्यांदा बुस्टर डाेसची घाेषणा केली आहे. चाैथ्या घाेषणेमुळे देशातील माेठ्या कंपन्यांना फायदा मिळेल. माेठ्या कंपन्यांचा करभरणा २८% कमी हाेईल आणि लहान कंपन्यांना १३% फायदा हाेईल. देशातील अव्वल ५० कंपन्यांचा नफा आणि महसूल अपरिवर्तित राहिल्यास त्यांना या आर्थिक वर्षात गेल्या वर्षीच्या तुलनेत ४६ हजार काेटी रुपये कमी कर द्यावा लागेल. गेल्या आर्थिक वर्षासाठी या कंपन्यांनी १.६५ लाख काेटी कर दिला हाेता.


टॅक्स बेस वाढ : महसूल नुकसानीची भरपाई
टेक्स बेस वाढल्याने महसुलावर १.४५ लाख काेटी रुपयांचा परिणाम होण्याची शक्यता आहे. ही खूप माेठी रक्कम आहे. मात्र, या निर्णयामुळे टॅक्स बेस वाढणार हे निश्चित आहे. जास्तीत जास्त कंपन्या अप्रत्यक्ष कर कक्षेत येतील आणि आपल्या उत्पादनाची याेग्य घाेषणा करतील. जास्त माेठा टॅक्स बेस आणि कमी कर दराच्या साहाय्याने महसुलात वाढ हाेईल. जगातील अन्य मोठ्या अर्थव्यवस्थेप्रमाणे भारतातही टॅक्स इन्सेटिव्ह कमी करण्याचा प्रयत्न होत आहे.


जेटलींचे २०१५ मध्ये कर कपातीचे सूतोवाच
अरुण जेटली यांनी २०१५ मध्ये म्हटले हाेते की, ४ वर्षांत कंपनी कर २५% हाेईल. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी प्रभावी कंपनी करास २५.१७% करण्याची घाेषणा केली आहे. रालाेआच्या मागच्या सरकारमध्ये अरुण जेटली यांचे आश्वासनही पूर्ण झाले आहे. जेटली यांनी २०१५-१६ च्या अर्थसंकल्पीय भाषणात ४ वर्षांत कंपनी कर घटवून २५% पर्यंत आणणार असल्याचे म्हटले होते. जेटली यांनी ५ मार्चला फिक्कीचे अध्यक्ष संदीप साेमाणी यांच्यासाेबतच्या चर्चेनंतर मतप्रदर्शन केले हाेते.


आर्थिक मरगळीवर सर्जिकल स्ट्राइक : निर्णय ऐतिहासिक, उद्योग जगत
आर्थिक मरगळ थांबेल आणि नकारात्मक भावनेवर हा सर्जिकल स्ट्राइक आहे. यामुळे उद्याेगाची स्थिती चांगली हाेईल आणि गुंतवणूक वाढेल तसेच तरलतेच्या चिंतेवर उपाय सापडेल. कंपनी कर घटल्यामुळे तत्काळ अर्थव्यवस्थेत १.४५ लाख काेटी रुपयांचा प्रवाह हाेईल. हे उद्याेग वाढीचे ठरेल. ३२% पेक्षा जास्त कंपनी कर भरणाऱ्या कंपन्यांना फायदा हाेईल. - जिमित माेदी, फाउंडर आणि सीईआे, सॅमकाे सेक्युरिटीज


भारतासाठी चांगला दिवस हाेऊ शकताे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि माेदी सरकारने उचललेले धाडसी पाऊल आहे. आता भारतात कर स्तर आशियातील अन्य बड्या अर्थव्यवस्थेच्या बराेबरीने आला आहे. यासाेबत उद्याेगासाठी दिलासादायक घाेषणा केल्या आहेत. मला वाटते की यामुळे भावनात्मक सुधारणा हाेईल. - अनिल अग्रवाल, चेअरमन, वेदांता


सरकारची घाेषणा काॅर्पाेरेट भारतासाठी खूप सकारात्मक आणि मोठ्या आधाराप्रमाणे असेल. लार्सन अँड टूब्राे, मारुती सुझुकी, महिंद्रा अँड महिंद्रा, काेटक महिंद्रा बँक, एचडीएफसी बँक, हिंदुस्तान युनिलिव्हर, डाबर, एचडीएफसी, बजाज आॅटाे आदींना थेट फायदा हाेणार आहे. - ए. के. प्रभाकर, रिसर्च हेड, आयडीबीआय कॅपिटल मार्केट

X
COMMENT