Home | Business | Business Special | India is the most expensive team in ICC cricket world cup

क्रिकेट विश्वचषकातील सर्वात महागडी टीम आहे 'इंडिया', भारतीय संघाची किंमत आहे तब्बल 194 कोटी रूपये

दिव्य मराठी वेब टीम | Update - Apr 21, 2019, 01:27 PM IST

विजय शंकर करारात समाविष्ट नसलेला एकमात्र खेळाडू

 • India is the most expensive team in ICC cricket world cup

  नवी दिल्ली- इंग्लंडमध्ये होणाऱ्या आयसीसी एकदिवसीय विश्वकपसाठी निवडण्यात आलेल्या भारतीय संघाची किंमत तब्बल 194 कोटी रूपये आहे. त्यामुळे भारतीय संघ विश्वचषक स्पर्धेतील सर्वात महागडा संघ ठरला आहे. राष्ट्रीय निवड समितीने स्पष्ट सांगितले की, विश्वकप संघ निवडताना आयपीएलमधील प्रदर्शन महत्वाचे नाही, पण संघात निवडण्यात आलेले सर्व 15 खेळाडू आयपीएलमधील आठ पैकी सात संघात सहभागी आहेत. केवळ राजस्थान रॉयल्स एकमात्र संघ आहे ज्यात खेळत असलेल्या खेळाडूंपैकी एकाही खेळाडूचा विश्वकप संघात समावेश नाही.

  विजय शंकर करारात समाविष्ट नसलेला एकमात्र खेळाडू
  विश्वकप संघाच्या भारतीय खेळाडूंना मिळणारे मानधन आणि आयपीएल निलामीची रक्कम पाहील्यास 15 खेळाडूंची एकूण किंमत 193.7 कोटी रूपये होते. या 15 खेळाडूमध्ये ऑलराउंडर विजय शंकर एकमात्र असा खेळाडू आहे, जो केंद्राच्या कोणत्याही करारात समाविष्ट नाही. भारतीय कर्णधार विराट कोहली, उपकप्तान रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह 7-7 कोटी रूपयांच्या करारात समाविष्ट आहेत.

  केदार जाधव आणि कार्तिक यांचा 1 कोटींच्या ग्रेडमध्ये समावेश
  महेंद्र सिंह धोनी, शिखर धवन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांचा 5-5 कोटींच्या A ग्रेडमध्ये समावेश आहे. लोकेश राहूल, युजवेंद्र चहल आणि हार्दिक पांड्या यांचा 3-3 कोटींच्या B ग्रेडमध्ये समावेश आहे, तर केदार जाधव आणि दिनेश कार्तिक 1-1 कोटींच्या C ग्रेडमध्ये समाविष्ट आहेत. या खेळाडूंचे ग्रेड पाहता यांची वार्षिक कराराची किंमत एकूण 62 कोटी रूपये होते.

Trending