दिल्ली / 4 जी माेबाइल इंटरनेटच्या वेगात भारत पिछाडीवर

ब्राॅडबँड वेगाची चाचणी करणाऱ्या उकला कंपनीने याबाबतचा अहवाल प्रसिध्द केला आहे

प्रतिनिधी

Nov 06,2019 10:51:00 AM IST

नवी दिल्ली : भारतात माेबाइल फाेन वापरणाऱ्या लाेकांची संख्या शेजारच्या पाकिस्तान, नेपाळ आणि श्रीलंकेतील एकूण माेबाइल युजर्सच्या तुलनेत कितीतरी जास्त आहे, परंतु माेबाइल इंटरनेट वेगाच्या बाबतीत मात्र भारत या तीन देशांपेक्षा पिछाडीवर आहे. ब्राॅडबँड वेगाची चाचणी करणाऱ्या उकला कंपनीने याबाबतचा अहवाल प्रसिध्द केला आहे. त्यानुसार सप्टेंबर २०१९ मध्ये भारत माेबाइल ब्राॅडबँड वेगाच्या बाबतीत १२८ व्या स्थानावर हाेता. उकलाच्या जागतिक वेग चाचणी निर्देशांकामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर सरासरी डाऊनलाेड वेग प्रती सेकंद २९.५ मेगाबिट असल्याचे दिसून आले. तर अपलाेड स्पीड ११.३४ एमबीपीएस हाेता. जागतिक यादीत दक्षिण काेरियाने ९५.११ एमबीपीएस डाऊनलाेड स्पीड आणि १७.५५ एमबीपीएस अपलाेड स्पीड नाेंद करीत पहिले स्थान पटकावले.

X
COMMENT