Home | Sports | From The Field | India levels series by 1-1 after winning 2nd T20 against NZ

दुसऱ्या टी20 मध्ये भारताचा न्यूझीलंडवर 7 विकेट राखून विजय, मालिकेत 1-1 ने बरोबरी, रोहितचे अर्धशतक

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 08, 2019, 03:00 PM IST

या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे.  

  • India levels series by 1-1 after winning 2nd T20 against NZ

    ऑकलंड - पहिल्या टी 20 सामन्यातील मोठ्या पराभवाचा बदला घेत भारताने दुसऱ्या सामन्यात न्यूझीलंडवर 7 विकेट राखत विजय मिळवला आहे. त्यांनी भारतासमोर 159 धावांचे आव्हान ठेवले होते. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 7 विकेट राखून विजयी कामगिरी केली. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या टी 20 मालिकेत 1-1 ने बरोबरी केली आहे. क्रुणाल पांड्याने 3 विकेट घेतल्या.

    न्यूझीलंडने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. पण पहिल्या सामन्यात धावांचा डोंगर उभारणाऱ्या किवी संघाची सुरुवात चांगली झाली नाही. पहिल्या डावातील हिरो ठरलेला सैफर्ट अवघ्या 12 धावांवर बाद झाला. त्यानंतर मनरो, विल्यमसन आणि मिशेल हेही फार काळ मैदानावर टिकले नाही. त्यामुळे किवी संघाची अवस्था 4 बाद 50 अशी झाली होती. पण त्यानंतर टेलर आणि डिग्रँडहोमने डाव सावरला. टेलरने 42 तर डिग्रँडहोमने 50 धावा करत न्यूझीलंडचा स्कोअर 8 बाद 158 पर्यंत पोहोचवला. भारताकडून सर्वाधिक 3 विकेत क्रुणाल पांड्याने घेतल्या. तर खलीलने दोन विकेट्स घेतल्या.

    भारतीय संघ 159 धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानावर उतरला. पण रोहित आणि शिखर ही भारताची सलामीची जोडी चांगल्या मूडमध्ये होती. त्यांनी सुरुवातीपासूनच फटकेबाजी केली. त्याजोरावर दोघांनी 79 धावांची सलामीची भागीदारी केली. रोहित शर्मा 50 तर शिखर 30 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेल्या रिषभ पंतने एका बाजुने डाव सावरला. पण विजय शंकर लवकर बाद झाल्याने धोनीला मैदानावर उतरावे लागले. त्याने रिषभला साथ दिली आणि रिषभने फटकेबाजी करत विजयी कामगिरी पूर्ण केली. रिषभने नाबाद 40 तर धोनीने नाबाद 20 धावा केल्या. 3 विकेट घेणारा क्रुणाल पांड्या सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला.

  • India levels series by 1-1 after winning 2nd T20 against NZ
  • India levels series by 1-1 after winning 2nd T20 against NZ
  • India levels series by 1-1 after winning 2nd T20 against NZ
  • India levels series by 1-1 after winning 2nd T20 against NZ

Trending