आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

HBD : राहुल द्रविडच्या नावावर आहे कोणत्याही क्रिकेटरला नकोशी वाटावी अशी आकडेवारी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - द वॉल नावाने प्रसिद्ध असलेला क्रिकेटपटू राहुल द्रविड याचा आज वाढदिवस आहे. राहुल द्रविड अनेकदा भारतीय संघ आणि पराभव यांच्याप्रमाणे एखाद्या भिंतीप्रमाणे ठाम उभा राहिला. म्हणूनच त्याला द वॉल असे नाव देण्यात आले. पण असे असले तरीही एक नकोशी अशी आकडेवारी द्रविडच्या कारकीर्दीत कायमची जोडली गेली आहे. कोणत्याही क्रिकेटपटुला आवडणार नाही अशी ही आकडेवारी आहे. 


निवृत्तीच्या सामन्यांत पराभव
नकोशी असलेलीही आकडेवारी म्हणजे राहुल द्रविड खेळलेल्या निवृत्तीच्या प्रत्येक सामन्यात त्याचा पराभव झालेला आहे. राहुल द्रविडच्या कारकिर्दीतील कसोटी, वन डे आणि टी 20 अशा सर्व प्रकारच्या शेवटच्या सामन्यांत भारताला पराभवाचा सामना करावा लागला आहे. विशेष म्हणजे द्रविडची कामगिरी या सामन्यांमध्ये चांगली राहिली आहे, पण भारतीय संघाचा पराभव झाल्याने आनंदावर जणू पाणी फेरल्याची भावना त्याच्या मनात असेल. 

 

राहुल द्रविडने 2011 मध्ये भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर असताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. याच दौऱ्यामध्ये त्याने करिअरचे अखेरचे कसोटी, वनडे आणि टी ट्वेंटी सामने खेळले. 


असे राहिले द्रविडचे अखेरचे सामने 

कसोटी
क्रिकेटची पंढरी म्हटल्या जाणाऱ्या लॉर्ड्सच्या मैदानावर द्रविडच्या कसोटी क्रिकेटचा अखेरचा सामना झाला. विशेष म्हणजे या सामन्यात द्रविडने शतकी खेळी केली. पण भारतीय संघाला डाव आणि 8 धावांनी पराभव पत्करावा लागल्याने हा आनंद त्याला साजरा करता आला नाही. या कसोटीच्या पहिल्या डावात द्रविडने नाबाद 146 दावा केल्या होत्या. तर दुसऱ्या डावात तो 13 धावांवर बाद झाला होता. 

कसोटीतील कारकीर्द 
एकूण सामने - 164 
एकूण धावा - 13288 
शतके - 36 
अर्धशतके - 63 


वन डे 
द्रविडचा अखेरचा वन डे सामना कार्डीफ येथे इंग्लंड दौऱ्यातील होता. या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 304 धावा केल्या होत्या. पण पाऊस आला आणि डकवर्थ लुईसच्या नियमानुसार इंग्लंडला टार्गेट देण्यात आले. त्यामुळे भारताचा 6 विकेट्सने पराभव झाला होता. या सामन्यातही द्रविडने अर्धशतकी खेळी केली होती. त्याने 79 चेंडूत 69 धावा केल्या होत्या. 

वन डेतील कारकीर्द 
एकूण सामने - 344
एकूण धावा - 10889 
शतके - 12 
अर्धशतके - 83 


टी 20
द्रविडने त्याच्या करिअरमध्ये अवघा एक टी 20 सामना खेळला. त्यातही भारताचा पराभव झाला इंग्लंड विरोधातील या सामन्यात भारताने प्रथम फलंदाजी करत 165 धावा केल्या होत्या. त्यात द्रविडने 31 धावा करत चांगली खेळी केली होती. पण या सामन्यातही इंग्लंडचा 6 विकेट्सने विजय झाला. दुर्दैवाचा भाग म्हणजे टी ट्वेंटी लीगच्या अखेरच्या सामन्यातही द्रविड खेळत असलेल्या राजस्थान रॉयल्स संघाचा टी ट्वेंटी चॅम्पियन लीगमध्ये पराभव झाला होता. 


 

बातम्या आणखी आहेत...