आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामँचेस्टर - अवघ्या ४५ मिनिटांच्या सुमार खेळीने टीम इंडियाला यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतून पॅकअप करावे लागल्याची प्रतिक्रिया कर्णधार विराट काेहलीने दिली. हा पराभव पचवणे आमच्यासह चाहत्यांसाठी अवघड आहे, असेही ताे म्हणाला. गत उपविजेत्या न्यूझीलंड संघाने आपल्या धारदार गाेलंदाजीच्या बळावर अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. न्यूझीलंडने पहिल्या उपांत्य सामन्यात भारताचा १८ धावांनी पराभव केला. यासह न्यूझीलंडच्या टीमने सलग दुसऱ्यांदा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. या संघाने गत २०१५ वर्ल्डकपच्या फायनलमध्ये प्रवेश केला हाेता. यादरम्यान टीमला पराभवाचा सामना करावा लागला हाेता. आता न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना आठ गड्यांच्या माेबदल्यात भारतासमाेर विजयासाठी २४० धावांचे लक्ष्य ठेवले हाेते. प्रत्युत्तरात भारतीय संघाला ४९.३ षटकांत अवघ्या २२१ धावांवर आपला गाशा गुंडाळावा लागला. भारताने शेवटच्या ११ चेंडूंवर आपल्या चार विकेट गमावल्या.
जडेजा-धाेनीची शर्थीची झुंज; शतकी भागीदारीची नाेंद
९२ धावांवर सहा विकेट पडल्याने भारतीय संघ चांगलाच अडचणीत सापडला. त्यानंतर आॅलराउंडर रवींद्र जडेजा (७७) आणि धाेनीने (५०) संघाचा डाव सावरला. त्यांनी सातव्या विकेटसाठी ११६ धावांची शानदार भागीदारी रचली. यासह त्यांनी संघाच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या हाेत्या.
या तीन गाेष्टींचा धक्का...
> वनडेच्या इतिहासात टाॅप-३ फलंदाज सपशेल अपयशी :
भारतीय टाॅप-३ फलंदाजांनी ३ धावा काढल्या. ही भारताची वनडेच्या इतिहासात आघाडीच्या फळीची सर्वात सुमार खेळी ठरली. २००५ मध्ये आफ्रिकेविरुद्ध आणि २००९ मध्ये विंडीज संघाविरुद्ध प्रत्येकी चार धावा काढल्या हाेत्या.
> वर्ल्डकपच्या नाॅकआऊट सामन्यात काेहली ठरला फ्लाॅप
काेहलीला वर्ल्डकपच्या नाॅकआऊट सामन्यांत अपयशी ठरला. ६ सामन्यांत १२ च्या सरासरीने ७३ धावा काढल्या. यात एकाही अर्धशतकाचा समावेश नाही. त्याची ३५ ही सर्वाेच्च धावसंख्या नाेंद आहे.
> २४०च्या प्रत्युत्तरात भारताचा ४१ सामन्यांत दुसरा पराभव
टीम इंडियाने गत सात वर्षांत २४० वा त्यापेक्षा धावांचा पाठलाग करताना दुसऱ्यांदा पराभवाचा सामना केला. यादरम्यान भारताने ४१ सामने खेळले. यातील ३९ सामन्यांत विजय मिळाला. धाेनीचा हा ३५० वा वनडे हाेता.
अविस्मरणीय ठरला वर्ल्डकप
> 1 राेहित शर्मा पाच शतके ठाेकणारा जगातील पहिला फलंदाज ठरला.
> 2 कर्णधार विराट काेहलीच्या सलग पाच सामन्यांत ५० + धावा.
> 3 शमीची हॅट््ट्रिक. अशी कामगिरी करणारा दुसरा भारतीय गाेलंदाज.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.