आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजच्या विजयाने भारत ठरेल विदेश दाैऱ्यामध्ये दोन मालिकांमधील 3+ सामने जिंकणारा पहिला संघ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हेमिल्टन - सलगच्य दाेन विजयाने जबरदस्त फाॅर्मात असलेला भारतीय संघ आता दाैऱ्यात टी-२० ची मालिका आपल्या नावे करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारत व न्यूझीलंड यांच्यातील  तिसरा टी-२० सामना बुधवारी हेमिल्टनमध्ये खेळवला जाईल. मालिकेत भारत २-० ने पुढे आहे. टीम इंडियाने हा सामना जिंकल्यास, विदेशात दोन द्विपक्षीय मालिकांत ३+ सामने जिंकणारी जगातील पहिली टीम बनेल. आतापर्यंत सहा संघांनी १-१ ने मालिका जिंकली आहे. तर चार टीम असे करू शकली नाही. टीम इंडियाकडून न्यूझीलंडमध्ये पहिल्यांदा टी-२० जिंकण्याची संधी आहे. दोन्ही देशांतील ही पाचवी द्विपक्षीय मालिका आहे. न्यूझीलंडने ३ व भारताने १ मालिका जिंकली. या मैदानावर भारत व न्यूझीलंड यांच्यात  टी-२० सामना झाला. २०१९ मध्ये  न्यूझीलंडने चार धावांनी विजय मिळवला हाेता.

भारतीय संघाने आतापर्यंत अखेरचे ५ टी-२० जिंकले 
टी-२० च्या फाॅरमॅटचा विचार केल्यास भारतीय संघाला घवघवीत असे यश संपादन करता आलेले आहे. भारताने याच फाॅरमॅटमधील आपले वर्चस्व अबाधित ठेवले. यातूनच भारताने आपले अखेरचे पाच टी-२० सामने जिंकले आहेत. त्यामुळे आता याच फाॅरमॅटमध्ये विजयाचा षटकार मारण्याचा भारतीय संघाचा मानस आहे. याच दिशेने संघाची वाटचाल आहे.  दुसरीकडे न्यूझीलंडचा संघ  यामध्ये आतापर्यंत अपयशी ठरलेला दिसताे. टीमचा चार सामन्यांत पराभव झाला, केवळ एक विजय मिळवला. अशात भारत आपली विजयी लय कायम ठेवू इच्छितो. मालिकेच्या पहिल्या दोन सामन्यांत भारताने पाठलाग करताना विजय मिळवला. मात्र, हेमिल्टनचा विक्रम त्यापेक्षा उलट आहे. येथे झालेल्या अखेरच्या चार सामन्यांत प्रथम फलंदाजी केलेल्या संघाने विजय मिळवला. २०१९ मध्ये न्यूझीलंडने येथे खेळताना ४ बाद २१२ धावा काढल्या. प्रत्युत्तरात भारत ६ बाद २०८ धावा करू शकला.

भारतीय गोलंदाजांची इकॉनॉमी न्यूझीलंडपेक्षा चांगली 
 पहिल्या दोन सामन्याँचा विचार केल्यास रवींद्र जडेजाने ६ षटकांत ६ च्या इकॉनॉमीने ३६ धावा दिल्या व ३ बळी घेतले. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ६.५० च्या रनरेटने धावा दिल्या व २ बळी मिळवले. डेथ ओव्हरमध्ये बुमराहचे प्रदर्शन चांगले राहिले. दुसरीकडे न्यूझीलंडच्या सर्व गोलंदाजीची इकॉनॉमी ८.५० च्या वर राहिली. डावखुरा फिरकीपटू सेंटनर व लेग स्पिनर ईश सोढीने सर्वात कमी ८.६२ च्या इकॉनॉमीने धावा दिल्या. 

राहुलला अर्धशतकी विक्रमाची संधी  
सलामीवीर लोकेश राहुलने मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत अर्धशतक झळकावले. त्याने टी-२० मध्ये सलग तीन सामन्यांत ५० पेक्षा अधिक धावा काढल्या. त्याने बुधवारी अर्धशतक ठोकले, तर चार सामन्यांत अर्धशतक करणारा तो भारताचा पहिला आणि जगातील केवळ तिसरा फलंदाज बनेल. आतापर्यंत विंडीजच्या क्रिस गेल व न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्युलमने सलग चार अर्धशतकांची कामगिरी केली आहे. 

ग्राँडहोमेच्या २ डावांत केवळ ३ धावा 
न्यूझीलंडकडून कोलिन ग्राँडहोमे २ डावांत केवळ ३ धावा करू शकला. तो या सामन्यात खेळण्याची शक्यता आहे. वेगवान गोलंदाज टिकनेरच्या जागी कुगलेजिनला संधी मिळू शकते. दुसरीकडे, भारताच्या शार्दूल ठाकूरने १३ च्या इकॉनॉमीने धावा दिल्या. त्यांची फलंदाजी चांगली आहे. नवदीपला संघात स्थान मिळू शकते. 

संभाव्य संघ : भारत : रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, नवदीप सैनी, यजुवेंद्र चहल, मो.शमी, जसप्रीत बुमराह. 

न्यूझीलंड : मार्टिन गुप्टिल, कोलिन मुन्रो, केन विलियम्सन, कोलिन डी ग्राँडहोमे, रोस टेलर, टीम सिफर्ट, मिचेल सेंटनर, ईश सोढी, टीम साऊदी, स्कॉट कुगलेजिन, हामिश बेनेट.