आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-न्यूझीलंड १६ वर्षांनंतर झुंजणार : फलंदाजीत भारत आघाडीवर तर न्यूझीलंड गाेलंदाजीत सरस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मँचेस्टर - यंदा विश्वविजेतेपदाच्या बहुमानापासून भारतीय संघ अवघ्या दाेन पावलांवर आहे. आता किताबाचे हे अंतरही कमी करण्याच्या इराद्याने टीम इंडिया आज मंगळवारी मैदानावर उतरणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात यंदाच्या वर्ल्डकपचा पहिला उपांत्य सामना रंगणार आहे. मँचेस्टर येथील मैदानावर हे दाेन्ही संघ समाेरासमाेर असतील. पहिल्यांदाच या दाेन्ही संघांमध्ये वर्ल्डकपचा उपांत्य सामना हाेत आहे. लीगच्या आतापर्यंतच्या सर्वच सामन्यांत सरस खेळी करत भारताने आपला दबदबा निर्माण केला. यासह भारताने सात विजयांच्या बळावर गुणतालिकेत अव्वल स्थानावर धडक मारली. दुसरीकडे न्यूझीलंडच्या टीमने अवघ्या पाच विजयांसह गुणतालिकेत चाैथे स्थान गाठले. यंदाच्या स्पर्धेत हे दाेन्ही संघ दुसऱ्यांदा समाेरासमाेर येत आहेत. यापूर्वीचा पहिला सामना पावसामुळे रद्द झाला हाेता. 

 

लीगमधील आतापर्यंतच्या सर्वच सामन्यांत भारताच्या फलंदाजांची कामगिरी सरस ठरली. या फलंदाजांनी आतापर्यंत प्रत्येक षटकात ५.८६ धावांची कमाई केली. म्हणजेच ५० षटकांत २९३ धावांची सरासरी नाेंद झाली. त्यामानाने न्यूझीलंडचे फलंदाज हे सपशेल अपयशी ठरत आहेत. 

 

भारताने जिंकले ३ उपांत्य सामने
भारताने आतापर्यंत विश्वचषकाचे सात उपांत्य सामने खेळले आहेैत. यातील तीन सामने भारताने जिंकले. तर, तीन लढती पराभवाचा सामना केला. तसेच न्यूझीलंडचा हा आठवा उपांत्य सामना आहे.

 

भारताची १९८५ मध्ये न्यूझीलंडवर मात; शास्त्री ठरले हाेते सामनावीराचे मानकरी
भारत व न्यूझीलंड संघ पहिल्यांदाच वर्ल्डकपच्या उपांत्य सामन्यात झंुजणार आहेत. यापूर्वी वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या उपांत्य सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव केला हाेता. भारताने हा सामना १९८५ मध्ये सात गड्यांनी जिंकला हाेता.  रवी शास्त्री सामनावीर पुरस्काराचे मानकरी ठरले हाेते. शास्त्रींनी  ३ बळी आणि ५३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली.

 

खेळपट्टी : वर्ल्डकपच्या पाच सामन्यांतील ४ डावांत ३०० + धावांची नाेंद आहे. या सर्वच सामन्यांत प्रथम फलंदाजी करणारे संघ विजयी. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला संघाची असेल पसंती.

 

> न्यूझीलंडच्या वेगवान गाेलंदाजांचा दबदबा 
न्यूझीलंडचे वेगवान गाेलंदाज जबरदस्त फाॅर्मात आहेत. त्यांनी आतापर्यंत ५९ विकेट घेतल्या. या टीमच्या गाेलंदाजांनी एकूण ६५ विकेटची कमाई केली. यात फॅर्ग्युसन हा १७ बळीसह अव्वल स्थानावर आहे. त्यापाठाेपाठ बाेल्ट (१५ बळी) दुसऱ्या स्थानावर आहे. तसेच जेम्स निशामने १२, मॅट हेन्रीने १० आणि ग्रॅण्डहाेमेने ५ विकेट घेतल्या. 

 

> {बुमराह अव्वलस्थानावर :
टीम इंडियाचा वेगवान गाेलंदाज जसप्रीत बुमराह हा सर्वाधिक १७ बळींसह अव्वल स्थानी आहे.  शमीने १४ आणि लेग स्पिनर चहलने ११ विकेट घेतल्या आहेत. 


फलंदाज: २ पावरप्लेमध्ये भारताचे खेळाडू वरचढ

भारतपावरप्लेन्यूझीलंड
4.65 सरासरीने धावा1-10 षटके4.61 सरासरीने धाव
5.67 सरासरीने धावा11-40 षटके6.59 सरासरीने धाव
8.43 सरासरीने धावा41-50 षटके6.13 सरासरीने धावा


    
        
गाेलंदाज: पावरप्ले-३ मध्ये भारताचे खेळाडू सरस
 

भारतपावरप्ले      न्यूझीलंड
1.12 विकेट घेत आहेत1-10 ओवर1.15 विकेट घेत आहे
4.87 विकेट घेत आहेत         11-40 ओवर       4.75 विकेट घेत आहे   
 3.66 विकेट घेत आहेत 41-50 ओवर

2.71 विकेट घेत आहे 

 

बातम्या आणखी आहेत...