आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
माउंट माॅनगुनाई- मालिका विजयाने आत्मविश्वास द्विगुणित झालेला भारतीय संघ आता सलग आठवा टी-२० सामना जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. क्रिकेटच्या या छाेट्या फाॅरमॅटमध्ये भारताने या मालिकेत चार आणि मालिकेपूर्वी सलग तीन सामने जिंकले आहेत. याच सात विजयांनी भारताचा संघ फाॅर्मात आहे. आता यामध्ये आठवा विजय नाेंदवण्याचा भारताचा प्रयत्न असेल. यासाठी भारतीय संघ आज रविवारी न्यूझीलंडविरुद्ध पाचवा आणि शेवटचा टी-२० सामना खेळणार आहे. भारताने या दाैऱ्यात यजमान न्यूझीलंडविरुद्ध पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेत आतापर्यंत सलग चार सामने जिंकून ४-० ने आघाडी घेतली. या मालिकेतील दाेन सामने भारताने सलग सुपर आेव्हरमध्ये जिंकले आहेत. त्यामुळे या मालिकेने जगातील तमाम क्रिकेटप्रेमींचे लक्ष वेधून घेतले. भारताने सलग सात टी-२० सामने जिंकले आहेत. यात मालिकेत न्यूझीलंडविरुद्ध चार, मालिकेपूर्वी श्रीलंकेविरुद्ध दाेन आणि विंडीजविरुद्ध एका सामन्याचा समावेश आहे.
मैदान यजमानांसाठी आहे खास लकी
माउंट माॅनगुनाई येथील मैदान यजमान न्यूझीलंडसाठी लकी आहे. येथे न्यूझीलंडने पाचपैकी चार सामने जिंकले, तर एक पराभव पत्करला आहे. भारतीय संघ या मैदानावर पहिल्यांदाच सामना खेळणार आहे.
ऋषभ पंतला संधी
मालिकेतील आता शेवटच्या टी-२० सामन्यात यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतला भारतीय संघाकडून खेळण्याची संधी मिळू शकेेल. या सामन्यासाठी शनिवारी संघ माउंट माॅनगुनाई येथे दाखल झाला आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात दाेन बदल हाेण्याची शक्यता आहे. यामध्ये लाेकेश राहुल व चहलला विश्रांती देण्यात येईल. यांच्या जागी राेहित व कुलदीपला सहभागी केले जाऊ शकेल. राेहितला चाैथ्या सामन्यादरम्यान विश्रांती देण्यात आली हाेती.
भारतीय संघावर दंडात्मक कारवाई
चाैथ्या सामन्यादरम्यान संथ गाेलंदाजी प्रकरणी भारतीय संघावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. सामन्यानिधीच्या ४० टक्केचा दंड ठाेठावण्यात आला आहे. सामनाधिकारी क्रिस ब्राॅड यांनी ही कारवाई केली.
हार्दिक कसोटी मालिकेतून बाहेर, सध्या अनफिट
अष्टपैलू हार्दिक पांड्या न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेतून बाहेर झाला. हार्दिकवर गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये पाठीवर शस्त्रक्रिया झाली. तो अद्याप पूर्णपणे तंदुरस्त झालेला नाही. २६ वर्षीय पांड्या गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) फिजियो आशीष कौशिकसोबत लंडनमध्ये सर्जन जेम्स एलिबोनीसोबत भेट घेतली होती. त्यानंतर पांड्याला बाहेर करण्याचा निर्णय घेण्यात आला. मंडळाचे सचिव जय शाहने म्हणाले की, पांड्या आता एनसीएत रिहॅब करेल. पांड्याने अखेरची कसोटी सप्टेंबर २०१८ मध्ये इंग्लंडमध्ये खेळली होती. फिटनेसमध्ये अपयशी ठरल्यानंतर गेल्या महिन्यात पांड्याला न्यूझीलंड दौऱ्यावर गेलेल्या भारत अ संघातून बाहेर केले. निवड समितीने विना रणजी सामना खेळता त्याची निवड केली होती. त्याच्या जागी विजय शंकरला पाठवण्यात आले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.