आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यूझीलंडच्या मैदानावर सलग दाेन विजयांत भारत आतापर्यंत अपयशी, भारत व न्यूझीलंड आज दुसरा सामना

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऑकलंड : सलामीच्या शानदार विजयाने जबरदस्त फाॅर्मात असलेला भारतीय संघ आता सलग दुसऱ्या सामन्यात बाजी मारण्यासाठी सज्ज झाला आहे. हा सामना जिंकून तिरंगा फडकावण्याचा भारतीय संघातील खेळाडूंचा मानस आहे. यासाठी टीम इंडिया आज रविवारी मालिकेतील दुसऱ्या टी-२० सामन्यात यजमान न्यूझीलंड संघाशी झंुजणार आहे. याच मैदानावर भारताने शनिवारी विजयी सलामी दिली. आता पुन्हा या मैदानावर विजयाचा कित्ता गिरवण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. मात्र, यासाठी भारतीय संघाला माेठी कसरत करावी लागणार आहे. कारण भारतीय संघाला आतापर्यंत न्यूझीलंडच्या मैदानावर सलग दुसऱ्या विजयाची नाेंद करता आलेली नाही. आता हीच अपयशाची मालिका खंडित करण्याचा टीमचा प्रयत्न असेल.

भारताने २००९ पासून आजतागायत न्यूझीलंड दाैऱ्यात सहा टी-२० सामने खेळले आहेत. यातील दाेन सामने जिंकले आणि चार सामने गमावले. भारताने दाेन्ही सामने अाॅकलंडच्या मैदानावर जिंकले आहेत. आता या मैदानावर भारताच्या कामगिरीवर सर्वांची नजर असेल.

लाेकेश राहुलच्या बाबतीतील निर्णय कर्णधार, काेच घेतील : गांगुली

मुंबई : युवा सलामीवीर लाेकेश राहुलच्या यष्टिरक्षकाबाबतचा निर्णय हा संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षक घेणार आहेत, अशी प्रतिक्रिया बीसीसीआय अध्यक्ष साैरव गांगुलीने दिली.

सध्या युवा यष्टिरक्षक ऋषभ पंत असतानादेखील राहुल हा विकेटकीपरच्या भूमिकेत खेळत आहे. यावरूनच सध्या जाेरदार चर्चा रंगली हाेती. राहुलची वनडे आणि टी-२० फाॅरमॅटमधील कामगिरी काैतुकास्पद आहे. आता त्याला कसाेटी सामन्यातही दमदार सुरुवात करण्याची गरज आहे. यासाठी त्याला कामगिरीमध्ये सातत्य ठेवावे लागेल, असेही गांगुली म्हणाला.

वर्षभरात भारताचे सर्वाधिक १२ विजय

१ जानेवारी २०१९ पासून आजपर्यंत टाॅप-१० मधील संघांच्या तुलनेत भारताची कामगिरी सरस ठरली. यादरम्यान वर्षभरात भारताने सर्वाधिक १२ विजय मिळवले. तसेच सात सामने गमावले आहेत. दुसरीकडे न्यूझीलंडने १३ सामने खेळताना ७ मध्ये विजयाची नाेंद केली, तर पाच सामन्यात सपशेल पराभव पत्करलेला आहे.

टीम : भारत: रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, शिवम दुबे, रवींद्र जडेजा, युजवेंद्र चहल, मोहमंद शमी, नवदीप सैनी, जसप्रीत बुमराह. न्यूझीलंड: मार्टिन गुप्टिल, कोलिन म्रुनाे, केन विलियम्सन, ग्रंॅडहाेमे , राॅस टेलर, टिम सिफर्ट, मिशेल संॅटनर, ईश साेढी टिम साउदी, ब्लेयर टिकनेर, हामिश बिनेट.

प्रथम फलंदाजीला पसंती; तीन संघ पराभूत

अाॅकलंडच्या मैदानावर आतापर्यंतच्या शेवटच्या पाच टी-२० सामन्यांत प्रथम फलंदाजी करणारा संघ अपयशी ठरला. पाचपैकी तीन सामने या संघांनी गमावले आहेत. यादरम्यान पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या संघाने १४६ धावसंख्येपर्यंत मजल मारली. मात्र, आता या ठिकाणी माेठ्या स्काेअरची नाेंद हाेण्याची शक्यता आहे.

महागड्या शार्दूलला विश्रांती; सैनीला संधी!

दुसऱ्या टी-२० सामन्यासाठी भारतीय संघामध्ये एकमेव बदल हाेण्याची शक्यता आहे. सलामीला महागडा ठरलेल्या शार्दूल ठाकूरला विश्रांती देण्यात येईल आणि त्याच्या जागी नवदीप सैनीला संधी मिळण्याची शक्यता आहे. महागडा असला तरीही शमीची खेळी चांगली राहिली आहे. तसेच जडेजा आणि शिवमचे स्थान कायम असेल.