आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

७ वर्षांत भारताचा घरच्या मैदानावर कसोटीत एकच पराभव; आज सामना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सरावसत्रादरम्यान गमतीदार गप्पा मारताना विराट कोहली, रवींद्र जडेजा, वृद्धिमान साहा, शुभमन गिल. - Divya Marathi
सरावसत्रादरम्यान गमतीदार गप्पा मारताना विराट कोहली, रवींद्र जडेजा, वृद्धिमान साहा, शुभमन गिल.

इंदूर - भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिली लढत गुरुवारी इंदूरच्या होळकर स्टेडियमवर होत आहे. यापूर्वी झालेल्या टी-२० मालिकेत भारताने २-१ ने बाजी मारली. आयसीसी कसोटी क्रमवारीत ९ व्या स्थानावरील बांगलादेशला नंबर वन भारताविरुद्ध मालिका जिंकणे सोपे नाही. विशेषत: भारताचा घरच्या मैदानावरील रेकॉर्ड पाहता टीम इंडियाने २०१३ पासून एकूण ३२ सामने खेळले आहेत. यात २६ विजय, ५ बरोबरीत राहिले व एकात पराभव झाला. टीम इंडिया फॉर्मात असलेल्या कसोटी संघात नियमितता आहे. टीमचे पाच सामन्यांत एकूण २४० गुण आहेत. चॅम्पियनशिपमध्ये खेळलेले पाचही सामने भारतीय टीमने जिंकले आहेत.
दुसरीकडे बांगलादेशची टीम भारतात येण्यापूर्वी अनेक विवादात राहिली. पहिले खेळाडूंचे आंदोलन, त्यानंतर शाकिब अल हसनवर बंदी. त्यानंतरही टीमने दिल्लीत टी-२० जिंकून भारतात चांगली सुरुवात केली. मात्र, पुढील दोन सामन्यांत भारताने पाहुण्या संघाला पुन्हा मागे ढकलले. आता नवीन कर्णधार मोमिनूल हक सोबत टीम भारताला पहिल्यांदा कसोटीत पराभूत करण्याच्या प्रयत्नात आहे. भारताची बलाढ्य फलंदाजी त्यांच्या गोलंदाजांना भेदावी लागणार आहे. चुका टाळून वेळीच संधीचा फायदा घ्यावा लागले. 
 

खेळपट्टी अहवाल : सुरुवातीच्या गोलंदाजांना मिळू शकते मदत 
इंदूरची खेळपट्टी फलंदाजांना मदतगार असते. मात्र सध्या खेळपट्टीवर थोडे गवत ठेवण्यात आले आहे. पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाजांना मदत मिळण्याची शक्यता आहे. बांगलादेश नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करु शकतो. भारताचे काही फलंदाज टिपून त्यांना दबावात आणण्यासाठी.  दुसरीकडे, भारतीय संघ फलंदाजी घेऊ शकतो. कारण रणनीतीनुसार गेल्या काही काळापासून टीम घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजी करत मोठी धावसंख्या उभारायची, त्यानंतर गोलंदाज २० विकेट घेता येईल. 
 

गेल्या ५ कसोटीत पुजाराची सरासरी २६ ची; गेल्या वेळी इंदूरमध्ये शतक 
कसोटी क्रमवारीत नंबर ३ फलंदाज चेतेश्वर पुजाराच्या बॅटमधून गेल्या काही दिवसांत धावा येत नाही. ही मालिका त्याला पुन्हा लयात येण्यासाठी महत्त्वाची ठरेल. पुजाराने कसोटी चॅम्पियनशिपच्या ५ सामन्यांत २५.६२ च्या सरासरीने २०५ धावा केल्या. गेल्या वेळी पुजाराने इंदूरमध्ये शतक केेले आहे. 
 

होळकरवर आतापर्यंत झालेली एकमेव कसोटी भारताने जिंकली 
इंदूरच्या होळकर स्टेडियमवर झालेली एकमेव कसोटी २०१६ मध्ये भारत-न्यूझीलंड यांच्यात झाली. तो सामना भारताने ३२१ धावांनी जिंकला. विराट कोहलीने दुहेरी शतक झळकावले होते. अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजाराने देखील शतक ठोकले हाेते. आर. अश्विनने त्या सामन्यात एकूण १३ गडी बाद केले.
 
 

मुख्य मुद्दे : अजिंक्य रहाणेला कसोटीत ४ हजार धावा करण्यास २५ धावांची गरज
> अजिंक्य रहाणेला कसोटीत ४ हजार धावा करण्यास २५ धावांची गरज. (६१ कसोटीत ३९७५ धावा.)
> वृद्धिमान साहाचे कसोटीत ९७ डिसमिसल (८६ झेल, ११ यष्टी) आहेत. १०० साठी तीनची गरज
>  धोनी (२९४), किरमानी (१९८), किरण मोरे (१३०), नयन मोंगिया (१०७)चे १०० डिसमिसल.
 

बातम्या आणखी आहेत...