आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत आमचा मित्र, तेल आयातीवर राष्ट्रहिताच्या दृष्टीने निर्णय मान्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तेहरान - भारत आमचा मित्र आहे. परंतु तेल आयातीवर भारत राष्ट्रहिताचा विचार करून निर्णय घेईल. ही बाब आम्ही समजू शकताे. ताे आम्हाला मान्य आहे, असे स्पष्ट करून भारताच्या ऊर्जा सुरक्षेची काळजी घेण्याची तयारी इराणने दर्शवली आहे.  


इराणचे राजदूत अली चेंगेनी म्हणाले, भारताला याेग्य दरात, सहज उपलब्ध हाेणारी व सुरक्षित अशी ऊर्जा पुरवठा करण्यास इराण तयार आहे. अमेरिकेच्या निर्बंधावर मात करण्यासाठी भारतासाेबत वित्त विनियाेगाची पद्धती बदलली पाहिजे, असे चेंगेनी यांनी सांगितले. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पाॅम्पिआे यांनी भारताला कच्च्या तेलाची आयात करताना ठाेस यंत्रणा उभी केली जाईल. त्याबाबत भारताला आश्वस्त केले जाईल, असे म्हटले हाेते. पाॅम्पिआे यांच्या विधानानंतर काही वेळातच चेंगेनींनी इराणची भूमिका मांडली. 


चेंगेनी यांनी जयशंकर यांच्या विधानाचीही आपल्या भूमिकेद्वारे आठवण करून देण्याचाही प्रयत्न केला. गेल्या आठवड्यात जयशंकर-पाॅम्पिआे यांच्यातील बैठकीत जयशंकर यांनी स्वस्त, सहज उपलब्ध हाेणारी व सुरक्षित ऊर्जा हवी आहे, असे मत मांडले हाेते. या सर्व गाेष्टींचा विचार केल्यास इराण हा भारतासाठी चांगला पर्याय ठरेल, असा दावा चेंगेनी यांनी केला. आम्ही मित्राकडून अशी अपेक्षा बाळगताे. आम्ही दाेन्ही देश परस्परांना समजू शकताे. आम्ही राष्ट्रहिताला प्राधान्य देताे.


चेंगेनी म्हणाले, भारत कायमचा मित्र आहे. राष्ट्रहित लक्षात घेऊन भारताने भूमिका घेतली आहे. जयशंकर यांच्या वक्तव्याला लक्षात घेतले आहे. त्यातून काेणताही नकारात्मक संकेत जात नाही. राष्ट्रहित सर्वांच्या दृष्टीने स्वीकारार्ह आहे. तरीही भारत इराण संबंधाबाबत कुठेतरी दबावाखाली आहे, असे वाटते. परंतु भारत हा इराणचा मित्र आहे यावर आमचा विश्वास आहे. 


भारताच्या इतर देशांसाेबत असलेल्या संबंधाचा आमच्या संबंधावर काहीही परिणाम हाेणार नाही. आमचे भारताशी असलेले संबंध एेतिहासिक आहेत. त्यातून परस्परांना हाेणारे लाभ व हितांचा विचार केलेला आहे, असे राजदूतांनी स्पष्ट केले. 


चाबाहार प्रकल्पावर परिणाम शक्य
भारताचा सहभाग असलेल्या चाबाहार प्रकल्पावर अमेरिकेच्या निर्बंधाचा काही परिणाम हाेईल का ? यावर इराणचे राजदूत चेंगेनी म्हणाले, अमेरिका म्हणते, हे बाेला, हे करा, असे चालले आहे. म्हणूनच चाबाहार प्रकल्पावर निर्बंधाचा अप्रत्यक्षपणे परिणाम हाेऊ शकताे. परिणाम हाेऊ नये, असेच आम्हाला वाटते. 


इराण पुन्हा प्लुटाेनियमचे उत्पादन करू शकताे : राष्ट्रपती हसन रुहानी
अण्वस्त्र करारावर स्वाक्षरी करणाऱ्या देशांनाच त्यांच्या जबाबदारीचे भान राहत नसेल तर इराणला आपल्या संयंत्रांना पुन्हा सुरू करावे लागेल. त्यामुळे प्लुटाेनियमचे पुन्हा उत्पादन करणे शक्य हाेऊ शकेल, असे इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी म्हटले आहे. इराण ७ जुलैपासून अराक येथील अणु संयंत्राला सुरुवात करील. त्यामुळे आपली पुन्हा जुन्या मार्गावरून वाटचाल सुरू हाेईल, असे रुहानी यांनी सरकारी टीव्हीवरून देशाला संबाेधित करताना सांगितले. अशा स्थितीत प्लुटाेनियमची निर्मिती शक्य हाेऊ शकते. वास्तविक अण्वस्त्र करारावर स्वाक्षरी करणाऱ्या देशांनाच आपल्या कर्तव्याची जाणीव राहिलेली नाही. अशा देशांनी आपली जबाबदारी घेतली पाहिजे. अन्यथा इराण याेग्य ते पाऊल टाकेल, असे रुहानी यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...