आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Pakistan Animosity Leads To 'SAARC' Jam, Bangladesh Foreign Minister A. K Abdul Momen Claims

भारत-पाकिस्तान वैमनस्यामुळे 'सार्क'ची वाटचाल झाली ठप्प, बांगलादेशचे परराष्ट्रमंत्री ए. के. अब्दुल माेमेन यांचा दावा

2 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

ढाका : सार्क संघटनेचा पुढे अपेक्षित असा विकास हाेऊ शकला नाही. त्यामागील अनेक कारणांपैकी भारत-पाकिस्तान यांच्यातील शत्रुत्व हे महत्त्वाचे कारण आहे, असा आराेप बांगलादेशचे परराष्ट्र मंत्री ए. के. अब्दुल माेमेन यांनी केला आहे. त्याचबराेबर क्षेत्रीय विकासासाठी आशावादी असल्याचेही त्यांनी सांगितले.

बिम्सटेक अंतर्गत ढाका येथे आयाेजित व्हिजिट नेपाळ-बांगलादेश कार्यक्रम-२०१९ मध्ये बाेलत हाेते. माेमेन म्हणाले, सार्क भलेही फार समृद्ध नाही. परंतु, बीबीआयएनला (बांगलादेश, भूतान, भारत, नेपाळ) व बंगालच्या उपसागरातील देश तंत्रज्ञान व आर्थिक सहकार्य (बिम्सटेक) अंतर्गत चांगली कामगिरीची संधी आहे. अलीकडे झालेल्या शेजारी देशांच्या बैठकीत आम्ही सार्क व शेजारील देशांसाेबतचे संबंध आणखी बळकट करण्याच्या मुद्यावर चर्चा केली. माेमेन यांचे वक्तव्य या महिन्याच्या सुरुवातीला दक्षिण आशियाई क्षेत्रीय सहकार्य संघटनेच्या (सार्क) सदस्यांत सहकार्य व समन्वयाचा अभाव दिसून येताे. भारत व पाकिस्तान यांच्यात परस्परांवर आराेप-प्रत्याराेप केले जातात. त्यानंतर समन्वयाचा अभाव वाढल्याचे स्पष्ट झाल्याचा आराेपही माेमेन यांनी केला आहे.

१९८५ ला पहिली बैठक


८ डिसेंबर १९८५ मध्ये सार्क परिषदेची पहिली बैठक झाली हाेती. मालदिव, भारत, भूतान, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश व श्रीलंका या देशांनी एकत्र येऊन संघटनेची स्थापना केली हाेती. त्याद्वारे दक्षिण आशियातील देशांनी परस्परांच्या विकासासाठी सहकार्य करण्याचा संकल्प केला हाेता. २००७ मध्ये या संघटनेत अफगाणिस्तानला नवीन सदस्य म्हणून सहभागी करून घेण्यात आले हाेते.

उरीतील हल्ल्यानंतर भारताचा नकार

२०१६ मध्ये इस्लामाबादला सार्क परिषदेचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्याच वर्षी उरीमध्ये दहशतवादी हल्ला झाला हाेता. त्यामुळे भारताने सार्क बैठकीला उपस्थित राहता येणार नसल्याचे कळवले हाेते. तेव्हापासून भारताने सार्कची बैठक टाळली आहे. त्यानंतर बांगलादेश, भूतान, अफगाणिस्तानने देखील बैठकीला हजर राहणार नसल्याचे कळवले. त्यामुळे ही बैठक बारगळली हाेती. तत्पूर्वी, २०१४ मध्ये भारताच्या प्रतिनिधीची बैठकीला हजेरी हाेती. ही भारताची शेवटची बैठक हाेती.

संघटनेच्या सदस्य देशांमुळे सुरक्षेबाबत धाेका वाढला, भारताची भूमिका

सार्क देशांतील एकजुटीसाठी भारताने सातत्याने प्रयत्न केले. परंतु, काही सार्क देशांमुळे दहशतवादांची समस्येची झळ वाढत राहिली, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी केले हाेते. त्याच्या आठवड्यानंतर माेमेन यांचे वक्तव्य जारी झाले आहे. दुसरीकडे गेल्या तीन वर्षांपासून भारताने सार्कपासून अंतर ठेवले आहे. संरक्षण पातळीवरील धाेक्यात वाढ झाली आहे. त्याला पाकिस्तान जबाबदार असल्याची स्पष्ट भूमिका भारताने वेळाेवेळी मांडली आहे. भारताने पाकिस्तानला दहशतवादाच्या विरोधात कडक उपाययोजना करण्याची सूचना केली होती.