आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UN मध्ये भेटणार भारत-पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री; या भेटीला शांतता चर्चेची सुरुवात समजू नये -भारत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - शांतता चर्चेत पडलेल्या मोठ्या खंडानंतर भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री न्यूयॉर्क येथे एकमेकांची भेट घेणार आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांनी नुकतेच पीएम नरेंद्र मोदींना पत्र पाठवले होते. त्यामध्ये दोन्ही देशांत पुन्हा शांतता चर्चा सुरू करण्यात यावी अशी इच्छा त्यांनी केली होती. संयुक्त राष्ट्रच्या आगामी महासभेत परराष्ट्र मंत्र्यांची भेट शक्य आहे असेही ते म्हणाले होते. इमरान खान यांनी हे पत्र 14 सप्टेंबर रोजी लिहिले होते. त्यावर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. मंत्रालयाचे प्रवक्ते प्रवक्ते रवीश कुमार यांनी मंत्र्यांच्या भेटीचा अर्थ दोन्ही देशांमध्ये शांतता चर्चा सुरू झाली असा घेऊ नये असे स्पष्ट केले आहे. 


ही शांतता चर्चेची सुरुवात नाही - भारत
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार म्हणाले, की "भारताने फक्त दोन्ही परराष्ट्र मंत्र्यांच्या भेटीसाठी होकार दिला आहे. परंतु, त्याचा अर्थ शांतता चर्चा सुरू झाली असा घेऊ नये. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांच्या विनंतीवरून परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज पाकिस्तानी समकक्ष शाह महमूद कुरेशी यांची संयुक्त राष्ट्रात भेट घेतील. या भेटीत भारताचा एजंडा अजुनही निश्चित झालेला नाही. त्यामुळे, भेट आणि चर्चेत फरक असतो. दहशतवादावर भारताची भूमिका अजुनही बदललेली नाही."

बातम्या आणखी आहेत...