आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

112 महीन्यात होतील तुमचे पैसे दुप्पट, मोदी सरकारने वाढवले या स्किमवरील व्याज दर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


नवी दिल्ली- जर तुम्हाला तुमचे पैसे दुप्पट करायचे असतील तर पोस्‍ट ऑफिसच्या "किसान विकास पत्र" (KVP) बचत स्‍कीम तुमच्यासाठी योग्य पर्याय होऊ शकतो. ही स्किम फक्त 112 महिन्यात तुमचे पैसे दुप्पट करते. जाणून घ्या या स्किममध्ये कशी गुंतवणूक कराल, याचे काय फायदे आहेत आणि कोण यात गुंतवणूक करू शकतो. 


काय आहे किसान विकास पत्र ? 
किसान विकास पत्र एक प्रकारचे प्रमाण पत्र आहे, याला कोणीही व्यक्ती विकत घेऊ शकतो. याला बॉन्‍ड प्रमाणे दिले जाते. यावर एक ठराविक व्याजदर मिळते. याला देशातील कोणत्याही पोस्ट ऑफिसमधून मिळवता येते. मोदी सरकारने 1 जानेवारी 2019 पासून यावरील व्याजदर वाढवून 7.7 टक्के केले आहे. यावूर्वी या स्किमवर 7.3 टक्के व्याजदर मिळत होते. 

 
सोबत कोणत्या सुविधा मिळतात ? 
या सरकारी स्किममध्ये तुम्हाला नॉमिनेशनची सुविधादेखील मिळते. एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे हे सर्टिफिकेट ट्रांसफर करता येते. एका पोस्‍ट ऑफिसमधून दुसऱ्या पोस्‍ट ऑफिसमध्येही ट्रांसफर करता येते. याला देशातील काही बँकांतून ऑनलाइल विकत घेऊ शकता. 
 

किती रूपयांची गुंतवणुक करू शकता ?  
किसान विकास पत्रमध्ये गुंतवणूकीसाठी काही मर्यादा नाहीये. पण तुमची किमान गुंतवणुक 1 हजार रूपये असावी लागणार आहे. तुम्ही हजार रूपयांच्या मल्टीपलमध्ये कितीही पैसे गुंतवू शकता. म्हणजेच तुम्ही 1500, 2500 किंवा 3500 रूपयांची गुंतवणूक नाही करू शकणार. या स्किममध्ये फक्त 1 हजार, 2 हजार आणि 3 हजारच्या क्रमानेच गुंतवणूक करता येईल.


किती दिवसानंतर काढू शकता पैसे ? 
तुम्हाला पैसे परत घेण्यासाठी कमीत-कमी अडिच वर्षांची वाट पाहावी लागेल. पण फाइनाशिअल एक्‍सर्ट या स्किममध्ये जास्त काळाच्या गुंतवणूकीचा सल्ला देतात.  

 

किती दिवसात पैसे दुप्पट होतील ? 
या स्किममध्ये पैसे गुंतवल्यास 7.7 टक्क्यांच्या हिशोबाने 112 महिने म्हणजेच 9 वर्षे आणि 4 महिन्यात तुमचे पैसे दुप्पट होतील. 


कोणत्या डॉक्‍यूमेंट आवश्यकता आहे ? 
2 पासपोर्ट साइज फोटो 
ओळख पत्र (राशन कार्ड, मतदान कार्ड, पासपोर्ट)
अॅड्रेस प्रुफ (वीज बील, टेलिफोन बील, बँक पासबुक)
तुमचे गुंतवणूक 50 हजारांपेक्षा जास्त असेल तर पॅन कार्ड

बातम्या आणखी आहेत...