आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Ranks 46th In The List Of 57 Countries With A Marginal Increase In House Prices

घरांच्या किमतीत किरकोळ वाढीसह भारत 57 देशांच्या यादीत 46 वा

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - घरांच्या किमती वाढण्याच्या बाबतीत भारत जगात ५६ देशांच्या यादीत ४७ व्या क्रमांकावर आहे. चालू वर्षाच्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत देशात घरांच्या किमतीत केवळ ०.६ टक्के वाढ झाली आहे. ग्लोबल प्रॉपर्टी कन्सल्टंट नाइट फ्रँकच्या एका अहवालात ही माहिती दिली आहे. अहवालानुसार मागणी मंदावल्यामुळे घरांच्या मागणीत किरकोळ वाढ झाली आहे. एप्रिल-जून तिमाहीत घरांच्या किमती वाढण्याच्या प्रकरणात भारत ११ व्या स्थानावर होता. दरम्यान देशात घरांच्या किमतीत ७.७% ची वाढ झाली आहे. नाइट फ्रँकने अहवालात जागतिक गृह निर्देशांक तिसरी तिमाही २०१९ मध्ये ५६ देश आणि स्थानांवर आधारित सांख्यिकी आकड्यांच्या आधारावर घरांच्या किमतीचे आकलन केले आहे. भारत यामध्ये ५६ देशांच्या यादीत ४७ व्या स्थानी आहे. गेल्या चार वर्षांत किरकोळ महागाई दरापेक्षा कमी राहिल्या आहेत.

घरांच्या विक्रीत सुधारणा, किमतीत नाही
याआधी अन्य एका मालमत्ता कन्सल्टन्सी फर्म एनारॉकच्या अहवालात २०१९ मध्ये भारतातील प्रमुख शहरांतील विक्रीत वाढ झाल्याचे नमूद केले आहे. मात्र, किमती जवळपास स्थिर आहेत. या अहवालानुसार, दिल्ली एनसीआरमध्ये या वर्षी ४९,९२० युनिट घरे विकली आहेत. हे गेल्या वर्षीच्या तुलनेत ६% जास्त आहे. देशातील सात मोठ्या शहरांत घरांची विक्री ५% दराने वाढली आहे. मुंबईमध्ये सर्वात जास्त २२% आणि पुण्यात १८%ची वृद्धी राहिली आहे.

५६ देशांत सरासरी ३.७% दराने वाढल्या किमती
सर्वेक्षणात ज्या ५६ देशांचा समावेश केला आहे, त्यात सरासरी ३.७% दराने घरांच्या किमतीत वाढ झाली आहे. हे गेल्या सहा वर्षांतील किमतीतील वाढीत सर्वात कमी दर आहे. बहुतांश देश आणि प्रदेशांत या वर्षी सप्टेंबरपर्यंत स्थिर किंवा हलकी सकारात्मक वृद्धी राहिली. फ्रँक इंडियाचे सीमएडी शिशिर बैजल म्हणाले, भारताच्या टॉप ८ शहरांत ४ वर्षांत घरांच्या किमतीत वृद्धी दर किरकोळ महागाई दरापेक्षा कमी राहिला. तरलतेत घट व मोठी इन्व्हेट्री यामागचे कारण आहे. 

रिअल इस्टेट सेक्टर अडचणीत
- एनबीएफसी संकटामुळे बाजारात घर खरेदीसाठी तरतलतेत घट
- मोठ्या बँकांकडेही सरप्लस भांडवल नाही. यामुळे कर्ज वाटपात कमतरता आली
- अर्थव्यवस्थेतील मंदीचा टप्पा असल्यामुळे रिअल इस्टेटसह सेक्टरमध्ये मागणी कमी

बातम्या आणखी आहेत...