आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Ranks Fifth In Spam Call Ranking, One Out Of Every Three Women Here Face Sexual Abuse And Inappropriate SMS

भारतात दर तीनपैकी एका महिलेला सेक्शुअल हॅरेसमेंटचे कॉल किंवा एसएमएस

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्पॅम कॉलच्या ग्लोबल रँकिंगमध्ये भारत पाचव्या नंबरवर, दोन वर्षात 15% वाढ

गॅजेट डेस्क- जगभरात स्पॅम कॉलच्या माध्यमातून लूट आणि आत्याचाराची प्रकरणी वाढत आहेत. मंगळवारी स्वीडिश कॉलर आयडेंटिफिकेशन अॅप ट्रूकॉलर(TrueCaller) ने सांगितल्यानुसार स्पॅम कॉलमध्ये भारत पाचव्या क्रमांकावर आहे, तर देशात दर तीनपैकी एका महिलेला सेक्शुअल हॅरेसमेंटचे कॉल किंवा एसएमएम येत आहेत.

भारतात प्रत्येक मोबाइल यूजरला दर महिन्यात 25.6 स्पॅम कॉल्स येत आहेत. हा आकडा मागच्या वर्षीच्या तुलनेत 15 टक्के वाढला आहे. ब्राझील पहिल्या स्थानानवर आहे, येथे अंदाजे प्रत्येक युजरला दर महिन्यात 46 स्पॅम कॉल येतात. विशेष म्हणाजे यापैकी 10 टक्के कॉल्स फायनांशिअल सर्व्हिस प्रोवायडरचे असतात. कंपनीने लिस्टमध्ये जगभरातील 20 देशांना सामील केले, जेथे सर्वात जास्त स्पॅम कॉल्स आणि मेसेज केले जात आहेत. मागच्या वर्षी भारत याच लिस्टमध्ये दुसऱ्या स्थानावर होता.

रिपोर्टमधील महत्वाचे मुद्दे
 
> भारतातील एकूण स्पॅम कॉल्सपैकी अंदाजे 67 टक्के कॉल्स टेलीकॉम ऑपरेटर्सचे असतात, ज्यात नवीन ऑफर्स आणि रिमाइंडर्सची माहिती असते.
> स्पॅम एसएमएसच्या टॉप 20 लिस्टमध्ये पहिल्या स्थानावर इथियोपिया आहे, येथील युजर्सना दर महिन्यात 119 स्पॅम कॉल्य येतात.
> रिपोर्टमध्ये ेक चकीत करणारी बाब म्हणजे, भारतात दर तीन महिलांपैकी एका महिलेला सेक्शुअल हॅरेसमेंटचे कॉल्स किंवा एसएमएस येतात.
> 17 टक्के कॉल्स टेलीमार्केटिंग, 10 टक्के कॉल्स फायनांशिअल सर्व्हिस आणि 6 टक्के कॉल्स इतर असतात.
> स्पॅम एसएमएसच्या टॉप 20 लिस्टमध्ये भारत आठव्या स्थानावर आहे, प्रत्येक यूजरला महीन्यूतन 61 स्पॅम एसएमएस येतात.
> लिस्टमध्ये यूएसदेखील टॉप 10 लिस्टमध्ये सामील आहे. रिपोर्टनुसार, येथे मागच्या वर्षीच्या तुलनेत 7 टक्के स्पॅम कॉल्स जास्त झाले आहेत.
> लेबनान देशात स्पॅम कॉल्सची टक्केवारी खूप जास्त आहे. येथील यूजर्सने 2.8 वरुन 8.6 स्पॅम कॉल आलेले पाहीले. एका वर्षात  208% वाढ.
> पेरूमध्ये स्पॅम कॉलची उल्लेखनीय वाढ झाली. दर महिन्याला अंदाजे 30.9 स्पॅम कॉल येतात.

बातम्या आणखी आहेत...