आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • India Ranks Third For Largest Tourist Source To Singapore In Visitor Source Arrival

सिंगापूरला जाणाऱ्या पर्यटकांच्या बाबतीत भारत तिसऱ्या क्रमांकावर; मुंबई, बंगळुरू आणि दिल्लीकर आघाडीवर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिंगापूर - सलग चौथ्यांदा, सिंगापूरने 2018 मध्ये एक दशलक्षहून अधिक भारतीय प्रवाशांचे स्वागत केले. भारतातीत आउटबाउंड प्रवासासाठी सिंगापूर हे एक सर्वात पसंतीचे ठिकाण असल्याचेही यातून पुन्हा अधोरेखित झाले आहे. सिंगापूरसाठी व्हिजिटर सोर्स अरायव्हल (व्हीए) सोर्स मार्केट म्हणून भारताने चीन व इंडोनेशिया या देशांनंतर तिसरे स्थान स्थान कायम राखले असल्याचे सिंगापूर टुरिझम बोर्डने (एसटीबी) जाहीर केले आहे. भारताने पहिल्यांदा 2017 मध्ये हे स्थान साध्य केले होते. भारताने अमेरिकेनंतर (14%) 13% इतकी दुसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक वाढ नोंदवली.


बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली व मुंबई अशा महत्त्वाच्या महानगरांनी 2018 मध्ये सिंगापूरसाठी सर्वाधित व्हिजिटरची नोंद केली - 498,000 पर्यटक, त्यामध्ये वार्षिक वाढ 8%. अन्य महानगरे व दुसर्या क्रमांकाची शहरे यांना सहभागी करून घेण्याच्या एसटीबीच्या प्रयत्नांना यश आले व या शहरांतून येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली. हैदराबाद, कोलकाता, पुणे, अमृतसर, कोइम्बतूर व विशाखापट्टणम यांचा समावेश असणाऱ्या या शहरांनी 2018 मध्ये 253,000 पर्यटकांचे योगदान दिले व वार्षिक 12% वाढ नोंदवली.


2018 मध्ये, क्रुझ हॉलिडेनिमित्त भारतातून 160,000 पर्यटक सिंगापूरमध्ये आले. त्यामध्ये वार्षिक वाढ 27% झाली आणि सिंगापूरसाठी आघाडीचे क्रुझ ट्रॅव्हल सोर्स मार्केट म्हणून भारताचे स्थान कायम राहिले. 2018 मधील तिसऱ्या तिमाहीपर्यंत, सिंगापूरमध्ये दोन दशलक्ष बीटीमाइस जागतिक व्हिजिटर आले, त्यामध्ये वार्षिक वाढ 14% झाली. 2018 मध्ये, मीटिंग्ज अँड इन्सेन्टिव्ह (एमअँडआय) यानिमित्त सिंगापूरमध्ये भारतातील सर्वाधिक ट्रॅव्हल ग्रुप आकृष्ट झाले. त्यामध्ये अॅम्वे इंडिया व व्होल्टास अशा प्रमुख कॉर्पोरेटचाही समावेश होता.


भारतीय बाजारपेठ विचारात घेता, एसटीबीसाठी 2018 हे वर्ष अतिशय भरगच्च होते. एसटीबीने “पॅशन मेड पॉसिबल” हा डेस्टिनेशन ब्रँड आक्रमकपणे सादर केला आणि भारतातील वैविध्यपूर्ण ग्राहकांसमोर सिंगापूरचे वैविध्य मांडले – कुटुंबे, करिअरची सुरुवात व स्थैर्य, क्रुझ ट्रॅव्हलर्स, टिअर 2 व 3 शहरांतील मीटिंग व इन्सेन्टिव्ह ग्रुप व ट्रॅव्हलर. एसटीबीने ग्राहकांना सहभागी करून घेण्यासाठी अनेक उपक्रम हाती घेतले, जसे व्हीएच 1 सह भारतातील आंतरराष्ट्रीय पर्यटन संस्थेतर्फे पहिलावहिला इंग्रजी म्युझिक व्हीडिओ सहयोग, पेटीएम व ओला अशा ग्राहकांच्या नजिक असणाऱ्या ब्रँडबरोबर मार्केटिंगसाठी भागीदारी आणि दक्षिण भारताला लक्ष्य करण्यासाठी इलयराजा यांच्यासह म्युझिक प्रमोशनल सहयोग. एसटीबीने सिंगापूर हॉलिडेजचा प्रसार करणाऱ्या ट्रॅव्हलविषयक मध्यस्थांशी जोडले जाण्यासाठी 21 शहरांत ट्रॅव्हल ट्रेड उपक्रमही राबवले.


2019 मधील, दक्षिण भारतासाठी एसटीबीच्या पहिल्या ट्रेडविषयक कार्यक्रमाचा भाग म्हणून, चेन्नई व बेंगळुरू येथे बोलताना, एसटीबीचे एसएएमईएचे (दक्षिण आशिया, मध्य पूर्व व आफ्रिका) प्रादेशिक संचालक जी. बी. श्रीथर यांनी सांगितले, “2018 मध्ये सिंगापूरची लोकप्रियता वाढवल्याबद्दल आम्ही आमच्या सर्व सहयोगींचे अतिशय ऋणी आहोत. त्यांच्या सहकार्यामुळे आम्हाला भारतातून 1.44 दशलक्ष व्हिजिटर मिळाले. सिंगापूरमधील वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळे व साइटसीइंग, तसेच प्रवाशांच्या निरनिराळ्या आवडीनिवडींना वाव देणारे आकर्षक उपक्रम व वर्षभरातील महोत्सव व साजरीकरण विचारात घेता, 2019 मध्ये भारतातील अधिकाधिक व्हिजिटरचे सिंगापूरमध्ये स्वागत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”


2019 मध्ये सिंगापूरमध्ये येण्यासाठी व वारंवार भेट देण्यासाठी अनेक कारणे विचारात घ्यायला हवीत. येथे, 17 एप्रिल रोजी, ज्वेल चांगी विमानतळाचे भव्य उद्घाटन होणार आहे. 1.7 अब्ज डॉलरची गुंतवणूक, 10 मजली संकुल असणाऱ्या या प्रकल्पात 280 हून अधिक दुकाने व फूड अँड बेव्हरेज (एफअँडबी) आउटलेट असतील. 2500 झाडे व 100,000 झुडुपे असणारे, दोन वॉकिंग ट्रेल व 40 मीटर उंच रेन व्होर्टेक्स असणारे – जगातील सर्वात उंच इन्डोअर धबधबा - पाचमजली उद्यान पर्यटकांना निश्चितच भुरळ घालेल. सिंगापूर केबल कार हे सिंगापूरमधील एक लोकप्रिय आकर्षण सुंदर दृष्य दाखवण्याची 45 वर्षे पूर्ण करत आहे आणि त्यानिमित्त फेबर पीक सिंगापूर येथील अरबोरा या टेकडीवरील रेस्तराँमध्ये अंदसना झाडावर ‘मिराक्युलस’ हा मल्टि-सेन्सरिअल व्हीडिओ-मॅपिंग शो पहिल्यांदाच दाखवला जाणार आहे. सिंगापूरच्या या एकमेव हिलटॉप ठिकाणी अनेक उपक्रम, कार्यक्रम नियोजित आहेत.


मादाम तुसाड्स सिंगापूरच्या सहयोगाने, टॉलिवूड सुपरस्टार महेश बाबू हे 25 मार्च 2019 रोजी हैदराबाद येथे जगातील आपल्या पहिल्या व एकमेव वॅक्स पुतळ्याचे अनावरण करणार आहे. मादाम तुसाड्स सिंगापूरसाठी हा खास क्षण असणार आहे, कारण सिंगापूरमधील नसणाऱ्या एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या पुतळ्याचे अनावरण पहिल्यांदाच केले जाणार आहे. महेशचा वॅक्स पुतळा मादाम तुसाड्स सिंगापूरमध्ये आणला जाणार आहे. तेथे अगोदरच प्रतिष्ठित व्यक्तींचे पुतळे, आयफा पुरस्काराचा अनुभव मिळतो व आता चित्रपट कलाकारांचाही अनुभव मिळणार आहे. महेशच्या सर्व चाहत्यांना लवकरच सुपरस्टार महेशबरोबर सेल्फी काढण्याची संधी मिळणार आहे.


बीटीमाइसच्या बाबतीत, सिंगापूरमध्ये काही प्रमुख उपक्रम होणार आहेत – केस्परस्की सिक्युरिटी अनालिस्ट समिट 2019, केपीएमजी एशिया पॅसिफिक टॅक्स समिट 2019, 18वी एशिया पॅसिफिक लाइफ इन्शुरन्स काँग्रेस 2021 आणि एशियन पेटण्ट अटर्नीज असोसिएशन जनर असेम्ब्ली अँड कौन्सिल मीटिंग 2022. एकत्रितपणे, या कार्यक्रमांच्या निमित्ताने सिंगापूरमध्ये 10,500 परदेशी पाहुणे येतील, अशी अपेक्षा आहे. एसटीबी भारतातील एमअँडआय ट्रॅव्हलरपर्यंत पोहोचणार आहे व त्यांना सिंगापूरला येण्यासाठी INSPIRE व BeIS अशा विविध सवलत योजनांद्वारे आवाहन करणार आहे.


सिंगापूर टुरिझम बोर्डविषयी
सिंगापूर टुरिझम बोर्ड (एसटीबी) ही पर्यटन या सिंगापूरमधील एका महत्त्वाच्या आर्थिक क्षेत्रातील आघाडीची विकाससंस्था आहे. इंडस्ट्री पार्टनर्सच्या व या क्षेत्राच्या सहयोगाने आम्ही सिंगापूरमधील पर्यटन क्षेत्राला आकार देतो. पर्यटकांना त्यांच्या आवडीनिवडींसाठी हक्काचे व्यासपीठ मिळावे, या हेतूने एक वैविध्यपूर्ण ठिकाण म्हणून सिंगापूरचे महत्त्व अधोरेखित करून, पॅशन मेड पॉसिबल या ब्रँडला आम्ही सचेतन रूप दिले आहे. अधिक माहितीसाठी पाहा www.stb.gov.sg किंवा www.visitsingapore.com किंवा ट्विटरवर @STB_sg (https://twitter.com/stb_sg)

बातम्या आणखी आहेत...