आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली - भारताने दुसऱ्यांदा चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचे (बीआरआय) निमंत्रण फेटाळले. हे समिट याच महिन्यात २६-२७ एप्रिलला हाेणार आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने मागील महिन्यात या समिटचे आमंत्रण भारताला दिले हाेते. भारताने चीन-पाकिस्तान आर्थिक कॅरिडॉरवर (सीपीईसी) नाराजी दाखवत हे आमंत्रण स्वीकारले नाही.
सीपीईसीच्या माध्यमातून पाकिस्तान काश्मिरात आपले अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. भारत बीआरआयवर आपला निर्णय बदलेल, अशी अपेक्षा चीनला हाेती. कारण मागील वर्षी एप्रिल महिन्यात भारताचे पंतप्रधान नरेंद्र माेदी व चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्यात सकारात्मक चर्चा झाली हाेती. यापूर्वी २०१७ मध्ये भारताने चीनचे निमंत्रण फेटाळले हाेते. आता या समिटमध्ये २९ एेवजी ४० देश सहभागी हाेणार आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आणि रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन या समिटमध्ये सहभागी हाेणार आहे.
वन बेल्ट रोड प्रोजेक्ट चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांचा महत्त्वाचा प्रकल्प आहे. गुंतवणुकीच्या माध्यमातून चीनचा जगात प्रभाव वाढवणे हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. इटली पहिला युराेपियन देश आहे, ज्याने बेल्ट अँड रोड प्रोजेक्ट करारावर सही केली आहे.
पाकची मदत : पाकव्याप्त काश्मीरमधून चीन-पाकिस्तान आर्थिक कॅरिडॉेर जाताे
चीन-पाकिस्तान आर्थिक कॉरिडॉर चीनच्या शिनजियांग राज्यातील कशगर शहराला बलुचिस्तानच्या ग्वादर एअरपोर्टशी जाेडताे. हा प्रकल्प ४.१५ लाख काेटी रुपयांत पूर्ण हाेणार आहे. वादग्रस्त गिलगित-बाल्टीस्तानमधून हा प्रकल्प जाताे. हे पाकव्याप्त काश्मीरमधील शहरे आहेत. यामुळे भारताची चिंता वाढली आहे.
लहान देशांना प्रलाेभन : विचार न करता प्रकल्प; अनेक देशांवर कर्ज वाढेल
टीकाकार म्हणतात, हा प्रकल्प व्यावहारिकता न तपासता केला आहे. यासाठी व्याजदार जास्त आहे. यामुळे लहान देशांवर कर्ज वाढेल. चीनचा हा उद्देश तेव्हा स्पष्ट झाला जेव्हा २०१७ मध्ये कर्ज वाढल्यामुळे श्रीलंकेचे हंबनटोटा पोर्ट ९९ वर्षांच्या भाडेकरावर घेतले. आफ्रिकेपासून इराणपर्यंतच्या बंदरांवर चीनचे लक्ष आहे.
दहशतवादाची चिंता : मसूद अजहरवरील बंदीस चीनच्या विराेधामुळे भारत नाराज
भारताच्या बीआरआय परिषदेत सहभागी न हाेण्याचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे जैश-ए-मोहंमदचा दहशतवादी मसूद अजहर आहे. चीनने संयुक्त राष्ट्रात चार वेळा मसूदचा बचाव केला आहे. त्यासाठी व्हिटाे पाॅवरचा वापर केला. मसूदवर बंदीसाठी चीन सहकार्य करत नसल्याने भारत नाराज आहे. दुसरीकडे पाकिस्तानने मसूदला संरक्षण दिले आहे. मसूद अझहरवर बंदी आणण्यासाठी अमेरिका, ब्रिटेन व फ्राॅन्सने प्रस्ताव आणला हाेता; परंतु चीनने त्यात खाेडा घातला हाेता.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.