आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारताच्या या गावात लोक जगतात लग्झरी लाइफ, रस्त्यांवर फिरते मर्सडीज आणि बीएमडब्लू, या दिवशी भरते मोठे आयोजन...

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बिझनेस डेस्क- आपण गावांचा विचार केली तर आपल्याला खराब रस्ते, धुळ, बैलगाडी, मातीची घरे असे दृश्य दिसते. पण आम्ही तुम्हाला भारतातील अशा गावाबद्दल सांगणार आहोत जे कोणत्याही बाबतीत शहरांपेक्षा कमी नाहीये. या गावात धुळतर नाहीच पण खराब रस्तेही नाहीत. उलट चांगले रस्ते आहेत आणि त्या रस्त्यांवर मर्सडीज आणि बीएमडब्लू सारख्या महागड्या गाड्या धावतात. हे गाव आहे गुजरातमधील धर्मज. येथील लोक ग्रामीण आणि शहरी असे दोन्ही जीवण जगतात.

 
काय आहे या गावात ?
धर्मज गावची सगळ्यात मोठी खास बाब आहे त्याची संपन्नता. हे गाव कोणत्याही सरकारच्या मदती विना विकसीत झाले आहे. परदेशात वसलेले या गावातील लोक आपल्या गावाच्या विकासासाठी भरपुर पैसे पाठवतात. हे देशातील पहिले गाव आहे, जिथे लोकांचे भुतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ सांगणारे कॉफी टेबलबूक प्रकाशित झाली आहे. या गावाची वेबसाईट आहे, यांचे स्वत:चे गाणे आहे. या गावातील लोक सांगतात ब्रिटेनमध्ये त्यांच्या गावातील कमीत कमी 1500 कुटुंबीय राहतात, त्याशिवाय कॅनडात 200 तर अमेरिकेत 300 पेक्षा जास्त कुटुंब राहतात. या गावातील प्रत्येक कुटुबातील कमीत कमी 5 लोक परदेशात राहतात आणि याची माहिती असण्यासाठी एक डायरेक्टरी बनवली आहे, ज्यात कोण कुठे राहतो याची संपूर्ण माहिती आहे.


गावात आहे प्रायव्हेट बँक आणि खासगी शाळा 
या गावात डझनांपेक्षा जास्त बँक आणि प्रायव्हेट शाळा आहेत, या बँकांमध्ये गावातील लोकांचीच हजारांपेक्षा जास्ती रक्कम आहे. गावात मॅकडॉनल्ड सारखे पिझ्झा पार्लर आहेत, त्याशिवाय मोठ्या रेस्टॉरेंटची फ्रेंचाइजीदेखील आहे. त्य़ाशिवाय मोठे मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल आहेत.


प्रत्येक वर्षी साजरी करतात धर्मज-डे 
गावातील लोक दर वर्षी 12 जानेवारीला, धर्मज-डे साजरी करतात. यात सामील होण्यासाठी सगले एनआरआय येतात. ते महिनाभर येथे राहून आनंद लुटतात.

बातम्या आणखी आहेत...