Home | Sports | From The Field | India scored 273 runs in first innings, Pujara's century; India leads

चाैथी कसाेटी/ दुसरा दिवस: भारत पहिल्या डावात २७३ धावा, पुजाराचे नाबाद शतक

वृत्तसंस्था | Update - Sep 01, 2018, 07:23 AM IST

भारतीय संघाने शुक्रवारी इंग्लंडविरुद्ध चाैथ्या कसाेटीच्या पहिल्या डावात शानदार खेळी केली.

 • India scored 273 runs in first innings, Pujara's century; India leads

  साऊथम्पटन- मालिकेत बराेबरी साधण्याच्या इराद्याने मैदानावर उतरलेल्या भारतीय संघाने शुक्रवारी इंग्लंडविरुद्ध चाैथ्या कसाेटीच्या पहिल्या डावात शानदार खेळी केली. फाॅर्मात असलेल्या चेेतेश्वर पुजाराच्या (१३२) नाबाद शतकाच्या बळावर भारतीय संघाने टीम इंडियाने पहिल्या डावात इंग्लंडला २४६ धावांवर राेखले हाेेते. त्यामुळे भारताला २७ धावांनी अाघाडी घेता अाली. भारताकडून पहिल्या डावात चेतेश्वर पुजाराने शानदार नाबाद शतक झळकावले. यासह त्याने टीमला अाघाडीही मिळवून दिली. त्याला साथ देणाऱ्या फलंदाजांचा फार काळ मैदानावर निभाव लागला नाही. प्रत्युत्तरात इंग्लंडने दिवसअखेर दुसऱ्या डावात बिनबाद ६ धावा काढल्या.


  माेईन अलीचा पंच
  इंग्लंडकडून माेईन अली हा गाेलंदाजीत चमकला. त्याने पहिल्या डावात पाच बळी घेतले. त्याने १६ षटकांत ६३ धावा देताना हे यश संपादन केले. त्यापाठाेपाठ स्टुअर्ट ब्राॅडने ३ बळी घेतले. तसेच कुरन अाणि स्टाेक्सने प्रत्येकी १ गडी बाद केला.


  चेतेश्वर पुजाराचे नाबाद शतक
  भारताकडून संयमी खेळी करताना चेतेश्वर पुजाराने नाबाद शतकी खेळी केली. त्याने २५७ चेंडूंचा सामना करताना १६ चाैकारांच्या अाधारे नाबाद १३२ धावा काढल्या.


  काेहली-पुजाराने सावरले
  भारतीय संघाने ५० धावांवर दाेन गडी गमावले. त्यानंतर कर्णधार काेहलीने कंबर कसली. त्याने पुजारासाेबत तिसऱ्या गड्यासाठी ९२ धावांची भागीदारी केली. यातून त्यांनी संघाच्या धावसंख्येचा अालेख उंचावला. अर्धशतकाच्या वाटेवर असलेल्या काेहलीला (४६) सॅम कुरनने राेखले.

Trending