अमरावती / बेशिस्तीचा ठपका ठेवत भारत स्काऊट व गाइड संस्था बरखास्त

राज्य सरकारने आता केली  प्रशासक मंडळाची नियुक्ती  
 
प्रतिनिधी

Aug 12,2019 09:04:00 AM IST

अमरावती - शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना चांगल्या वर्तणुकीचे धडे देणाऱ्या भारत स्काऊट व गाईड संस्थेची राज्य कार्यकारी समिती बेशिस्तीचा ठपका ठेवत बरखास्त करण्यात आली आहे. संस्थेचे कामकाज सुरळीत चालावे म्हणून ९ ऑगस्टला पत्र काढत सरकारने तात्पुरत्या प्रशासक मंडळाची नियुक्ती केली आहे.

सर्व जिल्हा स्काऊट व गाईड संस्थांचे नियंत्रण करणाऱ्या या संस्थेचे विश्वस्त म्हणून जबाबदारी राज्यपालांकडे असते. संस्थेचे मुख्य आयुक्त बी. आय. नगराळे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे कामकाज सुरू होते. संस्थेने नियमांचे पालन न करता नियमबाह्य नेमणूका व पदोन्नती दिल्याचे अनेक प्रकरणे निदर्शनास आली आहेत. त्यामुळे सरकारकडून मिळालेल्या निधीचा गैरवापर झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आले. सरकारने २५ ऑक्टोंबर २०१८ च्या कार्यालयीन आदेशान्वये कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमध्ये झालेली अनियमितता दुर करण्यासाठी पथक गठीत करण्यात अाले. या पथकाच्या अहवालानुसार पुढे कारवाई करणे अपेक्षीत असल्याने संस्थेच्या अास्थापनेवर यापुढे होणाऱ्या पदभरतीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत आली. प्रशासकीय अनियमितता दुरुस्त करण्यासाठी कार्यकारी समिती बरखास्त करुन तात्पुरते प्रशासक मंडळ नेमले आहे.

भारत स्काऊट आणि गाईड या संस्थेसाठी त्यांच्या आस्थापनेवरील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वेतनावरील खर्च भागवण्यासाठी १०० टक्के अनुदान सरकार मंजूर करते. राज्य भारत स्काऊट ० गाईड या संस्थेला संस्थेने स्वीकारलेल्या नियमानुसार संस्थेच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी राज्य कार्यकारी समिती सेवा नियम तयार करण्याचे अधिकार देण्यात आले आहे.

शालेय स्तरावर विद्यार्थ्यांना चांगल्या वर्तणुकीचे धडे देणाऱ्या भारत स्काऊट व गाईड संस्थेची राज्य कार्यकारी समिती बेशिस्तीचा ठपका ठेवत बरखास्त करण्यात आली आहे. संस्थेचे कामकाज सुरळीत चालावे म्हणून ९ ऑगस्टला पत्र काढत सरकारने तात्पुरत्या प्रशासक मंडळाची नियुक्ती केली आहे.

सर्व जिल्हा स्काऊट व गाईड संस्थांचे नियंत्रण करणाऱ्या या संस्थेचे विश्वस्त म्हणून जबाबदारी राज्यपालांकडे असते. संस्थेचे मुख्य आयुक्त बी. आय. नगराळे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेचे कामकाज सुरू होते. संस्थेने नियमांचे पालन न करता नियमबाह्य नेमणूका व पदोन्नती दिल्याचे अनेक प्रकरणे निदर्शनास आली आहेत. त्यामुळे सरकारकडून मिळालेल्या निधीचा गैरवापर झाल्याचे प्राथमिकदृष्ट्या निदर्शनास आले. सरकारने २५ ऑक्टोंबर २०१८ च्या कार्यालयीन आदेशान्वये कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीमध्ये झालेली अनियमितता दुर करण्यासाठी पथक गठीत करण्यात अाले. या पथकाच्या अहवालानुसार पुढे कारवाई करणे अपेक्षीत असल्याने संस्थेच्या अास्थापनेवर यापुढे होणाऱ्या पदभरतीसाठी क्रीडा व युवक सेवा संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत आली. प्रशासकीय अनियमितता दुरुस्त करण्यासाठी कार्यकारी समिती बरखास्त करुन तात्पुरते प्रशासक मंडळ नेमले आहे.

भारत स्काऊट आणि गाईड या संस्थेसाठी त्यांच्या आस्थापनेवरील कर्मचारी, अधिकाऱ्यांच्या वेतनावरील खर्च भागवण्यासाठी १०० टक्के अनुदान सरकार मंजूर करते. राज्य भारत स्काऊट ० गाईड या संस्थेला संस्थेने स्वीकारलेल्या नियमानुसार संस्थेच्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यासाठी राज्य कार्यकारी समिती सेवा नियम तयार करण्याचे अधिकार देण्यात आले आहे.

मुंडे, मानूरकर समितीत
बृहृमुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे यांच्या अध्यक्षेत तर औरंगाबादचे अॅड. कार्तिक मुंढे, बीडचे संतोष मानूरकर यांचा सदस्य म्हणून समावेश असलेल्या तिघांच्या प्रशासक मंडळाची नियुक्ती करण्यात आली आहे.

X
COMMENT