आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्विस बँकेत पैसे ठेवण्यात ब्रिटनचा पहिला क्रमांक; टॉप 5 मध्ये अमेरिकेचाही समावेश, जाणून घ्या भारत कितव्या स्थानी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्यूरिख - स्विस बँकांत पैसे ठेवण्यात ब्रिटन सर्वांत पुढे आहे. स्विस नॅशनल बँक (एसएनबी) च्या रिपोर्टनुसार, 2018 साली जमा झालेल्या एकूण रकमेच्या 26% हिस्सा ब्रिटनच्या व्यावसायिकांचा होता. येथील बँकांत पैसे ठेवण्याच्या बाबतीत भारतीयांची संख्या हळू-हळू कमी होत आहे. भारत यावर्षी 74 व्या स्थानावर आहे. गेल्यावर्षी भारतीयांच्या जमा रकमेत 6% कमतरता आली होती. त्यावेळी भारत 73 व्या स्थानावर होता. स्विस बँकेतील जमा रकमेत 0.07% टक्के भारतीयांचा वाटा आहे. 


टॉप पाच देशांत अमेरिकेचा देखील समावेश
स्विस बँकांत ठेवणाऱ्या टॉप 5 देशांत अमेरिकेची देखील समावेश आहे. त्यानंतर वेस्टइंडीज, फ्रान्स आणि हाँगकाँगचा क्रमांक लागतो. स्विस बँकेतील जमा रकमेत या पाच देशांचा 50 टक्क्याहून जास्त हिस्सा आहे. टॉप देशांचा विचार केला असता त्यांची जमा रक्कम दोन-तृतीयांश आणि टॉप 15 देशांचा 75% हिस्सा आहे. 

> उर्वरित 10 देशांमध्ये बहामास, जर्मनी, लक्जमबर्ग, कॅमॅन आयलँड आणि सिंगापूरचा सहभाग आहे. भरात आणि शेजारील देश स्विस बँकेत पैसे जमा करण्याच्या बाबतीत खूपच पीछाडीवर आहेत. पाकिस्तान 82, बांग्लादेश 89, नेपाळ 109, श्रीलंका 141, म्यानमार 187 आणि भूटानचा 193 वा क्रमांक लागतो. 


भारत प्रथमच पाकच्या वरच्या स्थानावर पोहोचला 
गेल्या चार वर्षांत पाकिस्तान प्रथमच भारतपेक्षा खालच्या क्रमांकावर आला. पण दिलेल्या माहितीत दुसऱ्या देशांतील फर्मच्या नावावर पैसे जमा करणाऱ्याचे नाव समाविष्ट करण्यात आलेले नाही. स्विस बँकेत पैसे जमा करणारे लोक आपली ओळख लपविण्यासाठी नवनवीन शक्कल लढवत असल्याचे सांगितले जाते. 


> 2015 मध्ये भारत 75 व्या स्थानावर होता. तर 2014 मध्ये स्विस बँकेत पैसे जमा करण्याऱ्या देशांच्या यादीत भारताचे 61 वे स्थान होते. 2007 मध्ये भारताने जगातील टॉप 50 देशांच्या यादीत स्थान मिळवले होते. 2004 मध्ये भारताचा 37 वा क्रमांक होता. 


1996 ते 2007 पर्यंत भारत टॉप 50 देशांच्या यादीत होता
2007 नंतर भारत टॉप देशांच्या यादीतून खाली येत गेला. भारत 2008 मध्ये 55, 2009 मध्ये 59, 2011 मध्ये 55, 2012 मध्ये 71 आणि 2013 मध्ये 58 व्या स्थानावर होता. 2018 मध्ये भारतीयांच्या पैसे जमा करण्यात 6% कमी दिसून आली. तेव्हा ही रक्कम 6,757 कोटी रुपये होती.