नागरिकत्व विधेयक / भारताचा इम्रान खान यांना सल्ला; 'आमच्या अंतर्गत प्रकरणांवर टीका करण्याऐवजी आपल्या देशातील अल्पसंख्याक नागरिकांवर लक्ष द्या...'

  • पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी नागरिकत्व विधेयकावरुन भारतावर टीका केली

दिव्य मराठी वेब टीम

Dec 13,2019 10:44:00 AM IST

नवी दिल्ली- नागरिकत्व संशोधन विधेयक (कॅब)बद्दल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्या वक्तव्यावर भारतीय परराषट्र मंत्रालयाने हरकत घेतली. परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले की, त्यांनी आमच्या अंतर्गत प्रकरणांवर टीका करण्याऐवजी आपल्या देशातील अल्पसंख्य नागरिकांवर लक्ष द्या. इम्रान यांनी नागरिकत्व विधेयकावर गुरुवारी ट्वीट करुन टीका केली होती.

परराष्ट्र मंत्रायलाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी दिल्लीमध्ये पत्रकार परिषदेत म्हटले की, इम्रान यांच्या वक्तव्याचा काहीच अर्थ लागत नाही. पाकिस्तानातील ईश निंदा कायद्याचा उल्लेख करत कुमार म्हणाले की, शेजारील देशाने आपल्या संविधानातून अल्पसंख्याकावर आत्याचार केला.


बिगर मुस्लिमांना नागरिकत्व देण्याचा काळ 11 वरुन 6 वर्षे झाला


नागरिकत्व विधेयकानुसार अफगानिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेशमधील अल्पसंख्यक आश्रीत (हिंदू, शिख, जैन, बौद्ध, पारसी आणि ख्रिश्चन) धर्मातील नागरिकांना नागिरकत्व मिळण्याचा काळ 11 वरुन 6 वर्षे झाला आहे. मुस्लिम आणि इतर देशातील नागरिकांना हा अवधि 11 वर्षे कायम राहील.

X
COMMENT