आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लवकरच देशभर 100 gbps पेक्षा अधिक वेगवान इंटरनेट सेवा, ISRO चेअरमन के सिवन यांचा दावा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - भारतात 4जी इंटरनेट सेवा आल्यानंतरही विविध कंपन्या अजुनही स्पीड देत नसल्याची तक्रार ग्राहकांकडून केली जाते. परंतु, आता लवकरच देशभर तब्बल 100 gbps अर्थात सेकंदाला 1 लाख mb इतकी जबरदस्त स्पीड अनुभवता येणार आहे. भारतीय अंतराळ संशोधन संघटना इस्रोचे चेअरमन डॉ. के. सिवन यांनी यासंदर्भातील माहिती हैदराबाद येथील एका कार्यक्रमात शनिवारी बोलताना दिली आहे. यासाठी इस्रो पुढील वर्षाच्या शेवटपर्यंत तीन GSAT उपग्रह प्रक्षेपित करणार आहे असे सिवन यांनी स्पष्ट केले. 

 

यूझर्सच्या बाबतीत दुसरा, स्पीडच्या बाबतीत 76 वा भारत

येथील एका विद्यापीठाच्या कार्यक्रमात बोलताना इस्रोचे चेअरमन के. सिवन म्हणाले, की "इंटरनेट यूझर्सच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. तरीही इंटरनेट स्पीडच्या बाबतीत देशाचा क्रमांक 76 वा आहे. इस्रोने यापूर्वीच जून 2017 मध्ये जीसॅट-19 सोडले. या वर्षी इस्रो जीसॅट-11 आणि जीसॅट 29 लाँच करत आहे. पुढील वर्षाच्या सुरुवातीला जीसॅट-20 लाँच केले जाणार आहे. हे सर्व उपग्रह एकत्रितरित्या तब्बल 100 जीबी प्रति सेकंदपेक्षा जास्त इंटरनेट सेवा देशभर देऊ शकतील. जेणेकरून (इंटरनेट यूझर्स आणि स्पीडमध्ये असलेली) डिजिटल दरी दूर करता येईल."

 

बातम्या आणखी आहेत...