आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गगनभेदी यश : आता उपग्रह पाडण्याची मिळवली क्षमता, भारत अवकाशातही महाशक्ती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - अवकाशातच शत्रूचा उपग्रह (सॅटेलाइट) नष्ट करण्याची क्षमता भारताने बुधवारी मिळवली. डीआरडीओने तयार केलेल्या ए-सॅट (अँटी सॅटेलाइट) क्षेपणास्त्राच्या यशस्वी चाचणीमुळे भारत या क्षेत्रात रशिया, अमेरिका व चीननंतर चौथी महाशक्ती ठरला. या चाचणीला ‘मिशन शक्ती’ हे नाव देण्यात आले होते. अवघ्या ३ मिनिटांत हे कठीण मिशन अचूकतेने पूर्ण करण्यात आले. या चाचणीदरम्यान ३०० किमी उंचीवर पृथ्वीच्या निम्न कक्षेत परिभ्रमण करणाऱ्या भारताच्याच जुन्या उपग्रहाला लक्ष्य करून तो नष्ट करण्यात आला. डीआरडीओचे प्रमुख जी. सतीश रेड्डी म्हणाले, या यशामुळे सिद्ध झाले की, अशा मोहिमेत अगदी सेंटिमीटरपर्यंतची अचूकता मिळवण्यात आपण परिपक्व  झालो आहोत. 


घडले असे...
- सेवा बंद असलेला व सेकंदाला ७-८ किमी  वेगाने परिभ्रमण करणारा जुना उपग्रह पाडण्यात आला. 
- ओडिशातील एपीजे अब्दुल कलाम बेटावरून सोडण्यात आलेले ए-सॅट क्षेपणास्त्र ३ मिनिटांत उपग्रहावर.
- उपग्रहाचे अवशेष ३ आठवड्यांत पृथ्वीवर पडतील.


भविष्यात हे शक्य... देशाला अाकाशातही सुरक्षितता मिळेल
- ए-सॅट क्षेपणास्त्र यंत्रणा काय आहे?
अग्नी आणि आधुनिक हवाई सुरक्षा यंत्रणेचे हे मिश्रण आहे. भारताने ही यंत्रणा २०१२ मध्ये तयार केली होती. मात्र आता चाचणी आता घेण्यात आली.
- क्षेपणास्त्राचे कार्य कसे चालते?
यात दारूगोळा वापरलेला नसतो. याच्या वॉरहेडवर एक धातूची  जाड पट्टी असते. सॅटेलाइटवर ही पट्टी जोरात आदळते आणि सॅटेलाइट नष्ट होतो.
- डीआरडीओचे मिशन शक्ती काय होते?
डीआरडीओची ही तंत्रज्ञान मोहीम होती. संपूर्ण तंत्रज्ञान स्वदेशी आहे. सॅटेलाइटभेदी क्षेपणास्त्र भारतीय बनावटीचे आहे. 


- यामुळे देशाला काय लाभ होऊ शकतो?
भारतीय आकाश सुरक्षित होईल. संशयित उपग्रह भारतीय अवकाश हद्दीत प्रवेश करू शकणार नाही. शत्रूचे उपग्रह हेरगिरी करू शकणार नाहीत.
- ए-सॅटची चाचणी निवडणुकीतच का?
मुहूर्त फार पूर्वीच ठरला होता. निवडणुकीच्या काळात झालेली चाचणी हा केवळ योगायोग. यासाठी सिमुलेशन टेस्ट फार पूर्वीपासून सुरू होत्या. 
- नष्ट केलेल्या उपग्रहाचे काय होईल?
पृथ्वीच्या निम्न कक्षेत तो होता. आता त्याचे अवशेष पृथ्वीवर पडण्यासाठी तीन आठवडे लागतील. यामुळे पर्यावरणाचे कोणतेही नुकसान होणार नाही.