आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली : नुकतेच भारतीय पुरुष क्रिकेट संघाने बांगलादेशला कसोटी मालिकेत २-० ने हरवले. दुसरीकडे, भारतीय महिला संघाने वेस्ट इंडीजला वेस्ट इंspoडीजमध्ये टी-२० मालिकेत ५-० ने आणि वनडे मालिकेत २-१ ने हरवले. हे वर्ष भारतीय क्रिकेटसाठी चांगले ठरले. या वर्षी भारतीय पुरुष संघाला विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यातील पराभवाचा एक सामना वगळता. त्यांची कामगिरी सतत चांगलीच राहिली. विशेषत: कसोटीमध्ये भारतीय संघाने सलग दबदबा ठेवला. पुरुष व महिला दोन्ही संघांनी या वर्षी सातत्यपूर्ण कामगिरी केली. त्यामुळे २०१९ भारतीय क्रिकेटसाठी सोनेरी वर्ष ठरत आहे. महिला संघाने या वर्षी मर्यादित षटकांच्या (वनडे व टी-२०) एकूण ७ मालिका खेळल्या. यात ५ मालिका जिंकल्या व २ गमावल्या. गेल्या ३ मालिकांत टीमने सलग विजय मिळवला. दुसरीकडे, पुरुष संघ गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात कसोटीमध्ये पराभूत केल्यानंतर सलग जबरदस्त आत्मविश्वासासह उतरत आहे. गेल्या ७ कसोटी सामन्यांत भारताने विजय मिळवत, विक्रम रचला. यापूर्वी ६ पेक्षा अधिक सलग कसोटी कोणी जिंकू शकले नाही.
मयंक व शमी कसोटीत बेस्ट, विराट फलंदाजीत दुसऱ्यास्थानी...
कसोटीचे अव्वल ३ फलंदाज
फलंदाज : डाव : धावा : सरासरी
मयंक अग्रवाल : 13 : 872 : 67.07
विराट कोहली : 17 : 871 : 58.06
अजिंक्य रहाणे : 17 : 841 : 56.06
कसोटीचे अव्वल ३ गोलंदाज
गोलंदाज : डाव : बळी : सरासरी
मो. शमी : 22 : 47 : 19.29
इशांत शर्मा : 18 : 36 : 18.08
जसप्रीत बुमराह : 12 : 34 : 14.02
स्मृती मानधनाच्या वनडेत ७१ च्या सरासरीने धावा...
वनडेचे अव्वल ३ फलंदाज
फलंदाज : डाव : धावा : सरासरी
स्मृति मानधना : 7 : 423 : 70.50
मिताली राज : 11 : 338 : 42.25
जेमिमा रॉड्रिग्ज : 12 : 327 : 29.72
वनडेचे अव्वल ३ गोलंदाज
फलंदाज : डाव : धावा : सरासरी
स्मृति मानधना : 14 : 405 : 31.15
जेमिमा रॉड्रिग्ज : 13 : 302 : 25.16
शेफाली वर्मा : 9 : 222 : 27.75
पूनम यादवचे वनडेत व टी-२० चे एकूण ३५ बळी....
वनडेमधील अव्वल ३ गोलंदाज
गोलंदाज : डाव : बळी : सरासरी
पूनम यादव : 11 : 19 : 20.00
शिखा पांडे : 12 : 18 : 19.94
झूलन गोस्वामी : 11 : 18 : 20.11
गोलंदाज : डाव : विकेट : सरासरी
राधा यादव : 13 : 21 : 13.19
दीप्ती शर्मा : 14 : 19 : 13.84
पूनम यादव : 14 : 16 : 19.25
कसोटी चॅम्पियनशिप : सर्व संघ मिळून भारताच्या मागे
ऑगस्टमध्ये इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या अॅशेस कसोटी मालिकेतून पहिल्या कसाेटी जागतिक चॅम्पियनशिपला सुरुवात झाली. यात सध्या भारतीय टीम इतर संघांच्या पुढे आहे. भारतानेे कसोटी चॅम्पियनशिपच्या ७ सामन्यांत ७ विजय मिळवले व एकूण ३६० गुण जमा केले. इतर सर्व संघांचे मिळून २९२ गुण होतात. भारतानंतर ऑस्ट्रेलिया ६ सामन्यांत ११६ गुणांसह दुसऱ्या स्थानी आहे. तीन संघांना कसोटी चॅम्पियनशिपमध्ये अद्याप खातेही उघडले नाही.
महिला चॅम्पियनशिप : भारत तिसऱ्या स्थानावर
२०१७ मध्ये आयसीसीने महिला क्रिकेटमध्ये रोमांचकता वाढवण्यासाठी महिला चॅम्पियनशिपला सुरुवात केली. यात भारतीय संघ तिसऱ्या स्थानी कायम आहे. भारताने चॅम्पियनशिप अंतर्गत खेळलेल्या १८ सामन्यांत १० विजयांसह २० गुण मिळवले. ऑस्ट्रेलिया १८ पैकी १७ विजय मिळवत ३४ गुणांसह अव्वलस्थानी आहे. इंग्लंडने १८ पैकी १२ सामने जिंकले. तो दुसऱ्या स्थानी आहे. इंग्लंड, ऑस्ट्रेलियाकडून मालिका गमावल्याने भारत मागे पडला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.