Population / पुढील 8 वर्षात चीनला मागे टाकत जगातील सर्वात जास्त लोकसंख्येचा देश बनेल भारत, 2050 पर्यंत 164 कोटी होण्याचा अंदाज...


संयुक्त राष्ट्राच्या एका रिपोर्टनुसार या शतकाच्या अंतापर्यंत जगाची लोकसंख्या 11 अब्ज होईल
 

दिव्य मराठी वेब

Jun 18,2019 02:12:00 PM IST

नवी दिल्ली- जगात लोकसंख्येचा बाबती भारत दुसऱ्या स्थानावर आहे. संयुक्त राष्ट्रामध्ये अर्थव्यवस्था आणि सामाजिक प्रकरणाचा विभाग(यूएन-डीईएसए)ने सोमवारी एक रिपोर्ट जारी केली. या रिपोर्टनुसार, 2027 पर्यंत भारताची लोकसंख्या चीनपेक्षा जास्त असेल. सध्या भारताची लोकस्थ्या 1.36 अब्ज आणि चीनची लोकसंख्या 1.42 अब्ज आहे. रिपोर्टमध्ये सांगण्यात येत आहे की, 2050 पर्यंत भारताची लोकसंख्या 164 कोटी होईल.


शतकाच्या अंतापर्यंत खूप वाढेल लोकसंख्या
रिपोर्टमध्ये हेदेखील सांगण्यात आले आहे की, 21व्या शतकाच्या अंतापर्यंत जगाची लोकसंख्या जवळ-जवळ 11 अब्ज होईल. 2050 पर्यंत जगाच्या लोकसंख्येच्या अर्धी लोकसंख्या फक्त 9 देशांची असेल. यात भारत, नाइजीरिया, पाकिस्तान, कांगो, इथियोपिया, तंजानिया, इंडोनेशिया, इजिप्त आणि अमेरिका सामिल आहेत.


संयुक्त राष्ट्राच्या अभ्यासानुसार, पुढील 30 वर्षात जगाची लोकसंख्या अंदाजे 2 अब्जाने वाढून 9.7 अब्ज होईल. सध्या जगाची लोकसंख्या 7.7 अब्ज आहे. या शतकाच्या शेवटापर्यंत जगाची लोकसंख्या 10.9 अब्ज असेल.


संयुक्त राष्ट्र विभागाचे डायरेक्टर जॉन विल्मोथने सोमवारी प्रेस कॉन्फ्रेंसमध्ये सांगितले की, सध्या झालेल्या अभ्यासात असे समोर आले आहे की, जगाचील लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मागील 69 वर्षात जगाची लोकसंख्या 3 पटीने वाढली आहे. जॉन पुढे म्हणाले की, रिपोर्टमधून असे समोर आले आहे की, 2050 पर्यंत जगाची लोकसंख्या 10.1 अब्ज आणि 2121 पर्यंत 12.7 अब्ज होऊ शकते.


पुढील 30 वर्षात भारताच्या लोकसंख्येत 27.3 कोटींची वाढ. या हिशोबाने 2050 पर्यंत भारताची लोकसंख्या 164 कोटी होईल. या शतकापर्यंत भारतायी लोकसंख्या 1.5 अब्ज, चीनची 1.1 अब्ज, नायजीरियाची 73.3 कोटी, अमेरिकेची 43.4 कोटी आणि पाकिस्नाची 40.3 कोटी होईल.

X
COMMENT