आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागतिक चॅम्पियनशिपमध्ये भारत अव्वल, मात्र ऑस्ट्रेलियाची कामगिरी सर्वात चांगली

एका वर्षापूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • भारताचे चार मालिकांनंतर ३६० गुण झाले; २ मालिका शिल्लक
  • मालिकेत भारताला ९०, तर ऑस्ट्रेलियाला ९८.७ गुण

नवी दिल्ली- पहिल्यांदाच जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे. यात ९ संघांना स्थान मिळाले व सर्वांना ६ मालिका खेळण्यासाठी मिळतील. भारतीय संघाला काही दिवसांपूर्वी न्यूझीलंडने कसोटी मालिकेत ०-२ ने हरवले. ही आपली चौथी मालिका होती. आता आपल्या २ मालिका शिल्लक आहेत. सध्या भारत ३६० गुणांसह अव्वलस्थानी आहे. मात्र, सर्व संघांची कामगिरी पाहिल्यास भारताला प्रत्येक मालिकेत ९० गुण मिळाले, तर ऑस्ट्रेलियाला ९८.७ गुण मिळाले. चॅम्पियनशिपची फायनल जून २०२१ मध्ये लॉर्डसवर खेळवली जाईल. 


भारताने आतापर्यंत ३ देशांना हरवले : चॅम्पियनशिपमध्ये भारताने आतापर्यंत विंडीज, द. आफ्रिका व बांगलादेशविरुद्ध मालिका जिंकली. या वर्षाच्या अखेरीस आपल्याला ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जायचे आहे. 

बीसीसीआयने कॉस्ट कटिंगचे कारण देत आयपीएलच्या बक्षीस रकमेत ५० टक्के कपात केली. सर्व फ्रँचायझींना पाठवलेल्या पत्रात म्हटले की, चॅम्पियनला आता २० कोटी नाही, तर केवळ १० कोटी रुपये मिळतील. उपविजेत्याला १२.५ कोटींऐवजी ६.२५ कोटी रुपये देणार. पात्रता फेरीत पराभूत होणाऱ्या संघाला ४.३ कोटी रुपये मिळेल. एका अधिकाऱ्याने म्हटले, सर्व फ्रँचायझी चांगल्या स्थितीत आहेत. ते प्रायोजकांतून उत्पन्न वाढवू शकतात. त्यामुळे बक्षीस कपातीचा निर्णय घेतला.  मात्र, या निर्णायामुळे  फ्रँचायझी टीम नाराज आहे. प्रत्येक राज्याला आयपीएलच्या एका सामन्याच्या आयोजनासाठी १ कोटी रुपये मिळतील. ५० लाख बीसीसीआयकडून व ५० लाख फ्रँचायझीकडून दिले जाईल. पूर्वी फ्रँचायझी टीमला आयोजनासाठी केवळ ३० लाख दिले जात होते.