आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

72 वर्षांनंतर आज मिळणार ऑस्ट्रेलियात मालिका विजय; टीम इंडिया जिंकली किंवा ड्रॉ झाला तरी विजय निश्चित

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी- ऑस्ट्रेलियात ७२ वर्षांनंतर क्रिकेट कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न सोमवारी पूर्ण होईल. चार सामन्यांच्या मालिकेत अंतिम लढतीत भारताने पहिल्या डावात ६२२ धावा केल्या. तर ऑस्ट्रेलिया संघ ३२२ धावा करून बाद झाला. भारताने फॉलोऑन दिल्यानंतर चौथ्या दिवशी कांगारूंच्या ६ धावा झाल्या होत्या. आता अंतिम दिवशी डावाने पराभव टाळण्यासाठी त्यांना ३१६ धावा करावयाच्या आहेत. 


३१ वर्षे व १७२ कसाेटीनंतर ऑस्ट्रेलिया संघाला घरच्या मैदानावर फाॅलाेऑन 
फाॅर्मात असलेला भारतीय संघ आता ऐतिहासिक मालिका विजयाच्या उंबरठ्यावर आहे. कुलदीप यादवने (५/९९) ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात फिरकीच्या जाळ्यात अडकवले. त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाचा पहिल्या डावात अवघ्या ३०० धावांवर धुव्वा उडाला. त्यामुळे यजमान ऑस्ट्रेलियावर तीन दशके आणि १७२ कसाेटी सामन्यांनंतर आपल्या घरच्या मैदानावर फाॅलाेऑनची नामुष्की ओढवली. तसेच याच मैदानावर हा फाॅलाेऑन मिळाला. यापूर्वी १९८८ मध्ये इंग्लंडने सिडनी कसाेटीमध्ये ऑस्ट्रेलियाला फाॅलाेऑन दिला हाेता. त्यानंतर ही कसाेटी अनिर्णीत राहिली. आता ऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात बिनबाद ६ धावांवर खेळत आहे. मात्र, आताही ही कसाेटी ड्राॅ करण्याचा ऑस्ट्रेलिया टीमचा प्रयत्न असेल. यानंतरही ऑस्ट्रेलियाला आपल्या घरच्या मैदानावर मालिका पराभवाला सामाेरे जावे लागेल. भारताने या चार कसाेटी सामन्यांच्या मालिकेमध्ये २-१ ने आघाडी घेतली.

 

ऑस्ट्रेलियाची दमछाक : 
चाैथ्या दिवशी कालच्या ६ बाद २३६ धावांवरून ऑस्ट्रेलिया संघाने पहिल्या डावात सुरुवात केली. मात्र, टीमला आपला डाव सावरता आला नाही. दिवसाच्या सुरुवातीला सहाव्याच चेंडूवर ऑस्ट्रेलियाला जबर धक्का बसला. टीमचा कमिन्स (२५) बाद हाेऊन पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर नॅथन हा भाेपळाही न फाेडता बाद झाला. यामुळे २५८ धावांच्या दरम्यान

ऑस्ट्रेलियाने ९ विकेट गमावल्या. 

 

पुन्हा पावसाचा व्यत्यय; चाहत्यांनी केला गाेंधळ 
सलग दुसऱ्या दिवशी चाैथ्या कसाेटीत पावसाचा व्यत्यय आला. त्यामुळे दुसऱ्या डावाचा खेळ लवकर थांबवण्यात आला. दुसऱ्या डावात खेळण्यासाठी मैदानावर उतरलेल्या ऑस्ट्रेलियाने बिनबाद ६ धावा काढल्या. दरम्यान चाहत्यांनी गाेंधळ केला. 

 

६४ वर्षांनंतर पाच बळी; जाॅनीनंतर आता कुलदीप 
ऑस्ट्रेलियामध्ये ६५ वर्षांनंतर डावाच्या हाताच्या फिरकीपटूने पहिल्यांदा डावात पाच बळी घेतले. आता हे यश चाैथ्या कसाेटीत भारताच्या कुलदीप यादवने मिळवले. त्याने ९९ धावा देताना ५ गडी बाद केले. यापूर्वी १९५५ मध्ये इंग्लंडच्या जाॅनी वार्डलेने असा पराक्रम केला हाेता. 

 

चाैथ्यांदा भारतीय संघाने दिला ऑस्ट्रेलियाला फाॅलाेऑन 
टीम इंडियाने कसाेटीत ओव्हरऑल चाैथ्यांदा ऑस्ट्रेलियाला फाॅलाेऑन दिला. यापूर्वी भारताने १९८६ मध्ये सिडनीच्या मैदानावर यजमानांना फाॅलाेऑन दिला हाेता. याशिवाय १९७९-८० मध्ये भारत दाैऱ्यावर दाेन वेळा ऑस्ट्रेलियावर ही नामुष्की ओढवली हाेती.