आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज चाैथा वनडे; भारताची मालिका विजयावर नजर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

 चंदिगड - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चाैथा वनडे सामना आज रविवारी चंदिगडच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. सलगच्या दाेन विजयांतून भारताने या पाच वनडे सामन्यांच्या मालिकेत २-१ ने आघाडी घेतली. आता भारताची नजर या सामन्यात बाजी मारून मालिका विजयावर लागली आहे. रांचीच्या मैदानावरील तिसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाने मालिकेत विजयाची नाेंद केली. त्यामुळे आता हीच लय कायम ठेवण्याचा ऑस्ट्रेलियाचा प्रयत्न असेल.   


आघाडीवर असलेल्या भारतीय संघाची रांचीच्या मैदानावरील तिसऱ्या सामन्यातील कामगिरी सपशेल निराशादायी ठरली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने विजयासाठी दिलेल्या ३१४ धावांच्या प्रत्युत्तरात भारताची दमछाक झाली. यातून भारताला ३२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.  या सामन्यात काेहलीने एकाकी झुंज देताना शतक झळकावले. मात्र,इतर फलंदाजांच्या  अपयशामुळे टीमला पराभवाचा सामना करावा लागला. यामुळे भारताचा मालिका विजयाचा प्रयत्नही अपयशी ठरला.  आता भारताची नजर चाैथ्या सामन्यातील विजयावर लागली आहे. 


वनडेत ३०० धावांचे लक्ष्य गाठणे साेपे नसते.  मागील काही सामन्यांपासून भारतीय संघ असे माेठे लक्ष्य गाठण्यात सातत्याने अपयशी ठरत आहे. जगातील अव्वल  टीम असलेल्या भारताची ही सुमार कामगिरी चिंताजनक मानली जाते. कारण, आगामी वर्ल्डकपच्या पार्श्वभूमीवर अशी सुमार कामगिरी टीमसाठी धाेकादायक ठरू शकण्याची शक्यता आहे.  


भारताने गत १० सामन्यांत ३०० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग केला. यातील सात सामन्यांत भारताचा पराभव झाला. तर, अवघ्या तीन सामन्यांत भारताने विजयश्री खेचून आणली. 


धाेनीला विश्रांती व ऋषभला मिळेल संधी
मालिकेतील उर्वरित दाेन सामन्यांतून आता यष्टिरक्षक धाेनीने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे आता त्याच्या जागी या सामन्यांसाठी युवा यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतची निवड झाली. त्यामुळे आता त्याच्याकडून टीमला अव्वल कामगिरीची आशा आहे. यासाठीही ताे उत्सुक आहे. याशिवाय लाेकेश राहुललाही प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळेल. शिखर धवन, राेहित शर्मा, अंबाती रायडूसारखे फलंदाज अद्याप मालिकेत आपली छाप पाडू शकले नाहीत. 


बांगलादेश आणि  विंडीजविरुद्ध झालेल्या सामन्यातही भारतीय संघ ठरला अपयशी
भारताने गत १० पैकी तीन सामन्यांत ३००  वा त्यापेक्षा अधिक धावांचे लक्ष्य गाठले आहे. यातील दाेन विजयांत काेहलीने शतकाचे माेलाचे याेगदान दिले. २०१८ मध्ये भारताने विंडीजने दिलेले ३२३ धावांचे लक्ष्य गाठले हाेते. काेहलीने १४० धावांचे याेगदान दिले हाेते. २०१७ मध्ये पुण्याच्या मैदानावर भारताने इंग्लंडने दिलेले ३५१ धावांचे लक्ष्य गाठून सामना जिकंला हाेता.  काेहलीने १२२ धावांची खेळी केली. बांगलादेश आणि विंडीजविरुद्ध  माेठे लक्ष्य गाठता आले नव्हते. 

बातम्या आणखी आहेत...