आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारत-ऑस्ट्रेलिया चाैथी कसाेटी: काेहलीच्या मते अजूनही आर. अश्विन अनफिट; तरीही निवड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी- भारत - ऑस्ट्रेलिया यांच्यातील चाैथ्या कसाेटीला आज गुरुवारपासून सिडनीच्या मैदानावर सुरुवात हाेत आहे. यातील विजयाने भारताच्या नावे ऑस्ट्रेलियात पहिल्यांदा कसाेटी मालिका विजयाचा पराक्रम नाेंद हाेईल. त्यामुळे या महत्वाच्या कसाेटीसाठी बुधवारी भारतीय संघात काहीसा बदल करण्यात आला. त्यानुसार अश्विनला संधी देण्यात आली. मात्र, त्याच्या सहभागाबाबत व्यवस्थापक आणि कर्णधार विराट काेहलीमधील मते वेगवेगळी असल्याचे दिसते. 

 

बुमराह टाकणार कपिलदेवला मागे 
बुमराहला आता विक्रमात कपिलदेवला मागे टाकण्याची संधी आहे. त्याने मालिकेत २० विकेट घेतल्या. येथे एका मालिकेत सर्वाधिक विकेटचा विक्रम कपिलदेवच्या (२५) नावे आहे. त्यामुळे बुमराह या विक्रमापासून अवघ्या सहा पावलांवर आहे.