आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ख्वाजाच्या शतकाने ऑस्ट्रेलिया विजयी, भारतावर ३२ धावांनी मात; उद्या सामना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रांची  - सलगच्या दाेन पराभवांनंतर सावरलेला ऑस्ट्रेलिया संघ शुक्रवारी विजयी ट्रॅकवर परतला. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या आणि आपल्या निर्णायक वनडेत यजमान भारतावर मात केली. ऑस्ट्रेलियाने ३२ धावांनी ४८.२ षटकांत सामना जिंकला. यासह ऑस्ट्रेिलयाने भारताचे मालिका विजयाचे मनसुबे उधळून लावले. आता मालिकेतील चाैथा वनडे सामना उद्या रविवारी हाेणार आहे. सलामीवीर उस्मान ख्वाजा (१०४) व अॅराेन फिंच (९३) यांच्या झंझावाती फलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलियाने टीम इंडियासमाेर  ३१४ धावांचे माेठे लक्ष्य ठेवले. प्रत्युत्तरात भारताने २८१ धावांवर गाशा गुंडाळला. काेहलीने (१२३) केलेली शतकी खेळी व्यर्थ ठरली. त्याने मालिकेतील सलग दुसरे आणि करियरमधील ४१ वे शतक साजरे केले.  ऑस्ट्रेलिया संघाने तब्बल ९ सामने आणि १० महिन्यांनंतर वनडेत ३०० पेक्षा अधिक धावांची खेळी केली आहे.


राेहितचे ३५० षटकार पूर्ण;   सहावा फलंदाज  : टीम इंडियाच्या राेहित शर्माचा प्रत्युत्तरात माेठ्या खेळीचा प्रयत्न अपयशी ठरला. त्याने १४ धावांची खेळी करून पॅव्हेलियन गाठले. त्याने १४ चेंंडूंत २ चाैकार व एका षटकारासह १४ धावांची खेळी केली.   यासह  त्याला आंतरराष्ट्रीय िक्रकेटमध्ये (कसाेटी, वनडे व  टी-२०) ३५० षटकार पूर्ण करता आलेे. अशा प्रकारे हा आकडा गाठणारा राेहित हा भारताचा दुसरा व  जगातील सहावा फलंदाज ठरला. 


उस्मान ख्वाजा-फिंचची माेठी भागीदारी 
संघाची पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी कर्णधार अॅराेन फिंचने कंबर कसली. यासाठी त्याने तुफानी फटकेबाजी करताना ९३ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. यादरम्यान त्याने सहकारी उस्मान ख्वाजासाेबत संघाला १९३ धावांच्या भागीदारीची सलामी दिली. या दाेघांनी ३१.५ षटकांपर्यंत भारताची सुमार गाेलंदाजी फाेडून काढली. दरम्यान, शतकाच्या वाटेवर असलेल्या फिंचला कुलदीपने राेखले.

बातम्या आणखी आहेत...