आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IndvsAus : रोहितची शतकी खेळी ठरली निष्फळ, पहिल्या वन डे सामन्यात 34 धावांनी पराभव

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • भुवनेश्वर वनडे मध्ये 100 विकेट मिळवणारा 19वा भारतीय गोलंदाज बनला. 
  • 100 विकेट मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो 13वा वेगवान गोलंदाज आहे. 

सिडनी - ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील तीन वन डे सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला आहे. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत विजयासाठी भारतासमोर  289 धावांचे आव्हान ठेवले. पण भारताला नियोजित 50 षटकांत 9 बाद 254 एवढ्या धावाच करता आला. 

 

नाणेफेक जिंकत ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कसोटी मालिकेत कोसळेली फलंदाजी वन डे मध्ये मात्र काहीशी सावरलेली पाहायला मिळाली. सलामीचे फलंदाज लवकर बाद झाले तरी त्यानंतर ख्वाजा, मार्श, हँड्सकॉब यांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारताला 289 धावांचे आव्हान दिले. भारताकडून कुलदीप आणि भुवी यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. 

 

प्रत्युत्तरात भारताची सुरुवात मात्र चांगली झाली नाही. कुलदीप, कोहली आणि रायडू हे एकापाठोपाठ एक बाद झाले. त्यामुळे भारताची अवस्था 3 बाद चार धावा अशी झाली होती. पण त्यानंतर मैदानावर आलेल्या धोनीने रोहितच्या साथीने भारताचा डाव सावरला. धोनीने अर्धशतकी खेळी केली. पण वियजी कामगिरीपर्यंत तो टिकला नाही. त्याच्यानंतर रोहितने एका बाजुने किल्ला लढवत शतकी खेळी केली. पण त्याला दुसऱ्या बाजुने साथ मिळाली नाही. 

 

भुवीच्या 100 विकेट्स 
भुवनेश्वर कुमारने ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरॉन फिंचला तिसऱ्या ओव्हरमध्ये आऊट केले. या विकेटसह त्याने वन डेमधील 100 विकेट्स पूर्ण केल्या. अशी कामगिरी करणारा तो भारताचा 19 वा गोलंदाज आहे. तर वेगवान गोलंदाजांच्या यादीत तो तेरावा आहे. 94 वन डे मध्ये त्याने ही कामगिरी केली आहे. सर्वाधिक मॅच खेळून हा आकडा गाठणारा तो 5 वा भारतीय आहे.  


100 विकेटसाठी सर्वाधिक वन डे खेळणारे भारतीय 


सौरव गांगुली    - 308 सामने 
सचिन तेंडुलकर    - 268 सामने 
युवराज सिंह    - 266 सामने 
रवि शास्त्री    - 100 सामने 
भुवनेश्वर कुमार    - 96 सामने 

 
 

 

बातम्या आणखी आहेत...