आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेलबर्न टेस्ट / मालिकेत 2-1 च्या आघाडीसह विजयसाठी भारताला हव्या आणखी 2 विकेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न - भारताविरुद्ध तिसऱ्या टेस्ट सामन्यात ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या इनिंगमध्ये 8 गडी गमवून 258 धावा पूर्ण केल्या. ऑस्ट्रेलियास विजयासाठी आणखी 141 धावांची गरज आहे. तर भारताला विजय मिळवण्यासाठी फक्त 2 विकेट हव्या आहेत. फक्त दोन विकेट पाडून भारतीय संघ या टेस्ट मालिकेत 2-1 ची आघाडी घेऊ शकतो. चौथ्या दिवशी भारताच्या विजयाच्या मार्गात पॅट कमिन्स अडसर ठरला. त्याने टेस्टमध्ये सुरुवातीला 27 धावा देत 6 विकेट पटकावले. तर फलंदाजी करताना 61 धावा देखील काढल्या.


ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या इनिंगची सुरुवात चांगली नव्हती. ओपनर एरॉन फिन्च तीन रन काढताच बाद झाला. त्यावेळी टीमचा स्कोर फक्त 6 होता. त्याच्या जागी उतरलेल्या उस्मान ख्वाजाने मार्क्स हॅरिससोबत मिळून 27 धावा जोडल्या. टीमचा स्कोर 33 धावांवर पोहोचला तेव्हा रविंद्र जडेजाने हॅरिसला 13 धावांवर बाद केले. यानंतर ख्वाजाच्या सोबतीला उतरलेल्या शॉन मार्शने आणखी 30 धावा जोडल्या. यानंतर 63 च्या स्कोरवर शमीने ख्वाजाला तंबूत पाठवले. त्याच्या जागी ट्रॅव्हिस हेड आला. त्याने मार्शसोबत 51 धावांची पार्टनरशिप करून टीमचा स्कोर शतकापर्यंत नेला. मात्र, 113 धावांवर बुमराहने मार्शला बाद केले. टी ब्रेकपर्यंत ऑस्ट्रेलियाच्या 5 विकेचट पडल्या होत्या.


 

Stumps on Day 4 of the 3rd Test.

Australia 258/8, #TeamIndia 2 wickets away from victory #ASUvIND pic.twitter.com/if6aBFoIT0

— BCCI (@BCCI) December 29, 2018

 

इशांतने केली बेदींची बरोबरी
इशांतने ट्रॅव्हिसला बाद करताच टेस्टमध्ये त्याच्या 266 विकेट पूर्ण झाल्या आहेत. इशांत आता सर्वात जास्त विकेट घेणाऱ्या भारतीयांमध्ये संयुक्तरित्या 6 व्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याने भारताचे दिग्गज माजी क्रिकेटर बिशन सिंग बेदी यांची बरोबरी केली आहे. त्यांनी देखील आपल्या करिअरमध्ये 266 टेस्ट विकेट घेतल्या होत्या. सध्या इशांतपुढे अनिल कुंबळे (619), कपिल देव (434), हरभजन सिंग (417), रविचंद्रन अश्विन (342), जहीर खान (311) अशी 5 नावे आहेत.

 

बातम्या आणखी आहेत...