आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियाची अॅडिलेडवर 'कसाेटी'; 70 वर्षांत एक विजय, सात पराभव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अॅडीलेड - टीम इंडिया अाणि यजमान अाॅस्ट्रेलिया यांच्यातील चार कसाेटी सामन्यांच्या मालिकेला उद्या गुरुवापासून सुरुवात हाेईल. या मालिकेतील सलामीचा कसाेटी सामना अॅडिलेडच्या मैदानावर रंगणार अाहे. या मैदानावर टीम इंडियाची कसाेटी लागणार अाहे. कारण, या मैदानावर भारतीय संघाची ७० वर्षांपासूनच कामगिरी अत्यंत सुमार ठरलेली अाहे. येथे भारताने या सात दशकांत एका कसाेटीत विजयी पताका फडकावली. तर सात कसाेटी सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे ही पराभवाची मालिका खंडित करून या मैदानावर विजयाचे निशाण राेवण्याचा टीमचा प्रयत्न असेल. 

 

याची माेठी संधीही भारताला अाहे. कारण, यजमान अाॅस्ट्रेलिया संघ सध्या पराभवाच्या गर्तेत सापडेला अाहे. या टीमला गत महिन्यात एकही कसाेटी सामना जिंकता अाला नाही. त्यामुळे याचा निश्चित असा फायदा टीम इंडियाला हाेईल. त्यामुळे चाहत्यांची टीम इंडियाच्या कामगिरीवर नजर असेल. विंडीजविरुद्धच्या कसाेटी मालिका विजयाने भारताचे खेळाडू फाॅर्मात अाहेत. भारताने १९४८ पासून या मैदानावर ११ कसाेटी सामना खेळले अाहेत. यातील एकाच कसाेटीत भारताचा विजय झाला. 

 

काेहलीचे अावडते मैदान; हजार धावा पूर्ण करण्याची संधी 
काेहलीसाठी हे मैदान लकी अाहे. त्याने येथे २ सामन्यांत ९८.५० च्या सरासरीने ३ शतकांसह ३९४ धावा काढल्या. येथे सर्वाधिक धावा काढणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये ताे हा सहावा अाहे. द्रविडने येथे ४ सामन्यांत ४०१ धावा काढल्या अाहेत. येथे भारताकडून सर्वाधिक धावा विजय हजारे (२६१ ) यांनी काढलेल्या अाहेत. काेहलीला (९९२) येथे कसाेटीत हजार धावा पूर्ण करण्याची संधी अाहे. 

 

अॅडिलेडमध्ये भारतीय फलंदाज 
फलंदाज सामने धावा सरासरी 
राहुल द्रविड ०४ ४०१ ६६.८३ 
विराट कोहली ०२ ३९४ ९८.५० 
वीरेंद्र सेहवाग ०३ ३८८ ६४.६६ 
व्हीव्हीएस लक्ष्मण ०४ ३३७ ४२.१२ 
सचिन तेंडुलकर ०५ ३२६ ३२.६० 
अॅडिलेडमध्ये भारतीय गाेलंदाज 
गाेलंदाज सामने विकेट सरासरी 
कपिलदेव ०३ १९ २३.१० 
अजित अागरकर ०२ १३ २२.२३ 
अनिल कुंबळे ०३ १० ४९.५० 
घावरी ०२ ०८ ३५.१२ 
आबिद अली ०१ ०७ १६.५७ 

 

कांगारूंना लकी; ८ वर्षांपासून विजयी 
यजमान अाॅस्ट्रेलिया संघासाठी हे हाेमग्राउंड लकी मानले जाते. या ठिकाणी अाॅस्ट्रेलियाने अातापर्यंत ७६ कसाेटी सामने खेळले अाहेत. यातील ४० कसाेटी सामन्यांत अाॅस्ट्रेलियाचा विजय झाला. तर, १७ कसाेटींत अाॅस्ट्रेलियाचा पराभव झाला. यातील १९ कसाेटी सामने अनिर्णीत राहिले. अाॅस्ट्रेलियाला येथे गत ८ वर्षांत एकाही कसाेटीत पराभवाला सामाेरे जावे लागले नाही. 

बातम्या आणखी आहेत...