आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Sports
  • India Vs Australia Virat Hit Six Security Guard Catch On Boundary Sydney

विराट कोहलीने ठोकला षटकार, पण लोकांनी सिक्युरिटी गार्डसाठी वाजवल्या टाळ्या अन् शिट्ट्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात झालेल्या तिसऱ्या T-20 मॅचमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 विकेटने पराभव करत विजय मिळवला. पण या मॅचमध्ये एक सिक्युरिटी गार्ड चर्चेत आला आहे. या मॅचदरम्यान एक मजेशीर घटना घडली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेव्हा कॅप्टन विराट कोहलीने एक षटकार खेचला तेव्हा बाऊंड्रीवर उभ्या असलेल्या सिक्युरिटी गार्डने कॅच घेतली. त्याच्याकडून कॅच सुटणार होती, पण त्याने शरिराच्या मदतीने बॉल पकडून ठेवला. लोकांना ते खूप आवडले. प्रेक्षकांनी टाळ्या वाजवत त्याच्याशी हातही मिळवला. काहींनी तर उभे राहून त्याला सन्मानही दिला. ते पाहून तो सिक्युरिटी गार्ड हसू लागला. 


मालिका बरोबरीत सुटली 
भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान T-20 सिरिजमधील तिसरा सामना भारताने 6 विकेटने जिंकला. टॉस जिंकून आधी फलंदाजीसाठी उतरलेल्या ऑस्ट्रेलियाच्या टीम ने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट गमावत 164 धावांचे आव्हान रचले होते. त्यानंतर भारताने 4 विकेट गमावून विजय मिळवला. त्यामुळे मालिका बरोबरीत सुटली. पहिल्या मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला होता. तर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता. तर तिसरा सामना भारताने जिंकला.  

बातम्या आणखी आहेत...