आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑस्ट्रेलिया पाचव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन, भारत उपविजेता; फायनलमध्ये भारतावर ८५ धावांनी मात

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुनी (२५९) मालिकावीर; एकाच विश्वचषकात सर्वाधिक धावांचा विक्रम
  • हिली व मुनीचा झेल साेडणे महागात; दाेघींची १३६ धावांची भागीदारी

मेलबर्न - यजमान ऑस्ट्रेलिया संघाने जागतिक महिला दिनाच्या दिवशी रविवारी  वर्ल्ड चॅम्पियन हाेण्याचा बहुमान पटकावला. ऑस्ट्रेलिया संघाने  आपल्या घरच्या मैदानावर आयाेजित  महिलांच्या टी-२० विश्वचषकाच्या  फायनलमध्ये भारतावर मात  केली. ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाने ८५ धावांनी अंतिम सामना जिंकला. प्रथम फलंदाजी करताना यजमान ऑस्ट्रेलिया संघाने ४ बाद १८४ धावा काढल्या हाेत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाचा १९.१ षटकांत ९९ धावांवर खुर्दा उडाला. यासह ऑस्ट्रेलिया संघाने वर्ल्डकपवरचे आपले वर्चस्व अबाधित ठेवण्याचा पराक्रम गाजवला. यातून आता ऑस्ट्रेलियन संघाच्या नावे पाचव्यांदा  विश्वविजेता हाेण्याचा विक्रम नाेंद झाला.  पाच वेळच्या विश्वविजेत्या ऑस्ट्रेलिया संघाने चार देशात फायनल जिंकून हा किताब पटकावला आहे.  भारताच्या महिला संघाने पहिल्यांदाच वर्ल्डकपची फायनल गाठली हाेती. यादरम्यान पराभवामुळे टीमला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. ऑस्ट्रेलियाची एलिसा हेर्ली (७५) सामनावीर पुरस्कार आणि बेथ मुनी ही मालिकावीर पुरस्काराची मानकरी ठरली. एका विश्वचषकात सर्वाधिक  धावा करण्याचा पराक्रम बेथ मुनीने गाजवला. तिने यंदाच्या या विश्वचषकात सर्वाधिक २५९ धावा काढल्या. यापूर्वी मेग लर्निंगने २०१४ च्या विश्वचषकात २५७ धावा काढल्या हाेत्या. 

शतकी भागीदारीच्या सलामीने विजयाचा काैल :  


ऑस्ट्रेलिया  महिला संघाने नाणेफेक जिंकून  घरच्या मैदानावर प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यादरम्यान विजयाच्या इराद्याने मैदानावर उतरलेल्या सलामीवीर हेर्ली आणि बेथ मुनीने झंझावाती खेळी केली. त्यांनी शतकी भागीदारीच्या सलामीतून विजयाचा काैल दिला. हीच लय कायम ठेवताना ऑस्ट्रेलियन गाेलंदाजांनी भारताच्या महिला संघाचा झटपट खुर्दा उडवला. यातून ऑस्ट्रेलियाला ८५ धावांनी अंतिम सामन्यात धडाकेबाज विजयाची नाेंद करता आली. 


टर्निंग पॉइंट  हिली व मुनीचा झेल साेडणे महागात; दाेघींची १३६ धावांची भागीद
ारी


सामन्याच्या पहिल्याच षटकात हिलीचा सुटलेला झेल हा भारतीय संघाला महागात पडला. यादरम्यान ९ धावांवर असताना जीवनदान मिळाल्यावर तिने ६६ धावांची  खेळी केली. दीप्तीच्या पाचव्या चेंडूवर शेफालीने झेल साेडला हाेता. त्यानंतर  चाैथ्या षटकांत राजेश्वरी  गायकवाडने बेथ मुनीची झेल साेडली. ही संधी साधून मुनीने अर्धशतक ठाेकले. या दाेघींनी १३६ धावांच्या भागीदारीची नाेंद केली.

भारत तिसऱ्यांदा वर्ल्डकप फायनलमध्ये पराभूत

भारतीय महिला संघ तिसऱ्यांदा वनडे व टी-२० वर्ल्डकप फायनलमध्ये पराभूत झाला. यापूर्वी २००५ आणि २०१७ च्या   वनडे वर्ल्डकप फायनलमध्ये संघ पराभूत झाला हाेता. 

 

लेनिंग ३ टी-२० वर्ल्डकप जिंकणारी पहिली कर्णधार


कर्णधाराच्या भूमिकेत मेग लेनिंगने तिसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकप जिंकला. अशा प्रकारचा
पराक्रम गाजवणारी लेनिंग ही महिला व पुरुष गटात जगातील पहिली  कर्णधार ठरली.

महिला गटात १८ वर्ल्डकप; ऑस्ट्रेलियाने ११ जिंकले


महिला गटात आतापर्यंत वनडेचे ११ व टी-२०चे ७ असे  एकूण १८ वर्ल्डकप झाले. यात ऑस्ट्रेलियाने ११ वर्ल्डकप जिंकले. यात पाच टी-२० वर्ल्डकप ट्राॅफीचा समावेश आहे. ८६,१७४ चाहत्यांची हजेरी; महिला सामन्याची विक्रमी


मेलबर्न येथील भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील फायनल पाहण्यासाठी ८६,१७४ चाहत्यांनी आनंद लूटला. ही महिलांच्या सामन्यासाठीची विक्रमी  संख्या नाेंद झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...