आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Vs Bangladesh 2nd T20I Rajkot Match Weather Cyclone Maha Update Heavy Rainfall Forecast In Gujarat

भारत-बांगलादेश दुसऱ्या सामन्याला बसणार ‘महा’चा फटका  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजकोट - महा नावाचे चक्रीवादळ सध्या देशभरामध्ये धुमाकूळ घालत आहे. हे वादळ उद्या बुधवारी गुजरातमध्येही दाखल हाेण्याचा इशारा हवामान खात्याने साेमवारी दिला. त्यामुळे या ठिकाणी माेठ्या प्रमाणात मुसळधार पावसासह वादळाचा धाेका आहे. यातूनच या महा चक्रीवादळाचा माेठा फटका यजमान टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या टी-२० सामन्यालाही बसण्याची भीती आहे. या दाेन्हींमधील दुसरा सामना गुरुवारी राजकाेटच्या स्टेडियमवर आयाेजित करण्यात आला आहे. मात्र, आता या वादळामुळे हा सामना रद्द हाेण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. अद्याप याची काेणत्याही प्रकारची घाेषणा करण्यात आलेली नाही.  सध्या या मालिकेवर नैसर्गिक संकटाचे सावट निर्माण झालेले आहे. दिल्ली येथील सलामी सामना प्रदूषणाच्या धाेक्यामुळे अडचणीत सापडलेला हाेता.  दिल्ली येथील सलामीचा टी-२० सामना जिंकून बांगलादेशने आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना जिंकून  मालिका खिशात घालण्याचा बांगलादेशचा मानस आहे. 

बातम्या आणखी आहेत...