आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Vs Bangladesh T 20 Updates, Mushfiqur Rahim On Delhi Pollution & Indian Bowlers

मुशफिकुर म्हणाला, दिल्लीच्या वायू प्रदूषणापेक्षा आम्हाला भारतीय बॉलर्स झेलण्याचीच चिंता होती

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - बांग्लादेशने भारताला तीन टी-20 सिरीजच्या पहिल्याच सामन्यात 7 गडी राखून पराभूत केले. हा सामना रविवार दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडिअमवर खेळण्यात आला. दिल्लीत वायू प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतरही दोन्ही टीम मैदानावर उतरल्या. दिल्लीत आरोग्य आणीबाणी असतानाही चुरशीची लढत दिली. दिल्लीतील प्रदूषणाचा सामन्यात त्रास झाला नाही का असे प्रश्न दोन्ही संघाच्या खेळाडूंना विचारण्यात आले. त्यावर मॅन ऑफ द मॅच राहिलेल्या मुशफिकुर रहमानने दिलेल्या प्रतिक्रियेने सर्वांची मने जिंकली, "दिल्लीत खेळताना प्रदूषण नव्हे, तर भारतीय गोलंदाजांचा सामना करणे याची अधिक चिंता होती." असे तो म्हणाला.

मुशफिकुर पुढे म्हणाला, "आम्ही परिस्थितींची चिंता न करता सामना खेळला होता. जेव्हापासून आम्ही भारत दौऱ्यावर आलो, तेव्हापासूनच अशा वातावरणाचा सामना करावा लागत आहे. त्यामुळेच, आम्ही मॅचमध्ये चांगले प्रदर्शन केले. भारताला घरातच पराभूत करण्यापेक्षा चांगले दुसरे काहीच असू शकत नाही. माझ्यासाठी हेच सर्वात जास्त महत्वाचे आहे. सामन्यात सौम्य आणि माझ्यात चांगली जुगलबंदी होती."

मुशफिकुर-सौम्यची 60 धावांची पार्टनरशिप

टी-20 मध्ये भारतीय टीमने बांग्लादेशला 149 धावांचे आव्हान दिले होते. त्याचा पाठलाग करताना बांग्लादेशने 19.3 ओव्हरमध्येच 3 गडी गमवून 154 धावा काढत सामना जिंकला. यामध्ये मुशफिकुर रहीमने सर्वाधिक 60 आणि सौम्य सरकारने 39 धावा काढल्या. या दोघांच्या पार्टनरशिपने टीमला 60 धावा दिल्या.

तर दुसरीकडे, बीसीसीआयचे नवनियुक्त अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी वायू प्रदूषणातही गांभीर्याने सामना खेळल्याबद्दल दोन्ही टीमला धन्यवाद म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...