आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Vs England Women T20: Semifinal Canceled Due To Rain, India Qualifies For Final

भारत-इंग्लंड सेमीफायनल पावसामुळे रद्द, गुणतालिकेत टॉपवर असल्यामुळे भारताची फायलनध्ये धडक

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • आयसीसीच्या नियमानुसार, सामना रद्द झाल्यामुळे भारतीय टीम ग्रुपमध्ये टॉपवर असल्याकारणाने फायनलमध्ये पोहचली

स्पोर्ट डेस्क- महिला टी-20 विश्वचषकात भारत आणि इंग्लडदरम्यान होणारा सेमीफायनल सामना पावसामुळे रद्द झाला. गुणतालिकेत टॉपवर असल्यामुळे पहिल्यांदाच भारतीय टीम फायनलमध्ये पोहचली आहे. आयसीसीच्या नियमानुसार- सामना रद्द झाल्यामुळे भारतीय टीम आपल्या ग्रुपमध्ये टॉप वर असल्यामुळे अंतिम फेरीत धडक मारली आहे. ग्रुप-एमध्ये भारताने सर्व 4 सामने जिंकले आहेत. 

एकाच दिवशी दोन्ही सेमीफायनल

दुसरा सेमीफाइनल दक्षिण आफ्रीका आणि ऑस्ट्रेलियादरम्यान आज दुपारी 1.30 वाजता याच मैदानावर खेळवला जाणार आहे. जर हा सामनादेखील रद्द झाल्यास, गुणानुसार दक्षिण आफ्रीका फायनलमध्ये पोहचेल. अशा परिस्थिती 8 मार्चला मेलबर्नमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रीकेदरम्यान फायलन होऊ शकतो. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सेमीफायनलसाठी रिजर्व-डेची मागणी केली होती, पण आयसीसीने  नकार दिला. रिजर्व-डे फक्त फायनलसाठी राखीव असतो.

टीम इंडिया पहिला फायनल खेळेल

आतापर्यंत सहा महिला विश्वचषक झाले आहेत. भारतीय संघाला यापूर्वी एकदाही फायनलमध्ये धडक मारता आली नव्हती. तीन वेळेस भारतीय संघाने 2009, 2010, 2018 मध्ये सेमीफायनलमध्ये जागा मिळवली होती. तर, ऑस्ट्रेलियाने सर्वात जास्त 4 वेळा विश्वचषक जिंकला आहे. इंग्लंड आणि वेस्टइंडीजने प्रत्येकी एक-एक वेळेस विश्वचषक आपल्या नावावर केला आहे.