• India Vs New Zealand 3rd Live Mount Maunganui Cricket Score and Updates

वनडे मालिका / न्यूझीलंडकडून 0-5 च्या पराभवाचा 9 दिवसांत वचपा, 3-0 ने मालिका जिंकली

  • न्यूझीलँड सीरीजचा पहिला मॅच 4 विकेट आणि दुसरा सामना 22 धावांनी जिंकला
  • भारत 3+ सामन्यांच्या मालिकेत शेवटच 1988-89 मध्ये वेस्टइंडीजविरुद्ध 5-0 ने पराभूत झाला
  • दोन्ही संघात दोन टेस्टमधील पहिला सामना वेलिंगटनमध्ये 21 फेब्रुवारीला होत आहे

दिव्य मराठी वेब टीम

Feb 12,2020 08:49:27 AM IST

माउंट मॉनगानुई - न्यूझीलंडने तिसऱ्या वनडेत भारताला ५ गड्यांनी हरवले. त्यासह टीमने तीन सामन्यांची मालिका ३-० ने जिंकली. २ फेब्रुवारी रोजी संपलेल्या ५ सामन्यांची टी-२० मालिका न्यूझीलंडने ०-५ ने गमावली होती. टीमने ९ दिवसांत पराभवाचा बदला घेत वनडे मालिकेवर कब्जा केला.


भारताने प्रथम खेळताना ७ बाद २९६ धावा काढल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने ४७.१ षटकांत ५ गडी गमावत ३०० धावांसह विजय मिळवला. ८० धावा करणारा सलामीवीर फलंदाज हेनरी निकल्स सामनावीर ठरला. मालिकेत १९४ धावा काढणारा रॉस टेलर मालिकावीर बनला. ३१ वर्षांनी ३ पेक्षा अधिक सामन्यांच्या वनडे मालिकेत टीम इंडिया क्लीन स्वीप झाली. त्यापूर्वी १९८९ मध्ये विंडीजने आपल्या यजमानात भारताला ५-० ने हरवले होते. आता दोन कसोटी मालिकेला २१ फेब्रुवारीला सुरुवात हाेईल.


शॉ-मयंक दोघांनी वनडेची संधी गमावली : रोहित व धवनला दुखापत झाल्याने पृथ्वी शॉ व मयंक अग्रवालला मालिकेत सलामीची संधी मिळाली होती. मात्र, दोन्ही फलंदाज मालिकेत अर्धशतकही करू शकले नाहीत. शॉची सर्वोच्च खेळी ४० आणि मयंकची ३६ धावा राहिली. सामन्यात आठ धावा केल्या. मयंकला (१) जेमिसनने बाद केले. कोहली (९) पुन्हा अपयशी ठरला. शॉ धावबाद झाला. ६२ धावांवर ३ गडी बाद झाल्यानंतर आलेल्या श्रेयस अय्यर (६२) आणि लोकेश राहुलने (११२) चौथ्या गड्यासाठी १०० धावांची भागीदारी रचली.


पराभवाची दोन कारणे

कोहली अर्धशतक, बुमराह घेण्यात ठरला अपयशी

मालिकेत तीन सामन्यांत कर्णधार विराट कोहली एकच अर्धशतक करू शकला. त्याने ३ सामन्यांत ७५ धावा काढल्या. दुसरीकडे वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने ३ सामन्यांत ३० षटके टाकली. मात्र त्याला एकही विकेट मिळाली नाही. कोहली नंबर वन फलंदाज व बुमराह नंबर वन गोलंदाज आहे. तीन सामन्यांत पहिल्या १० षटकांत आमच्या गोलंदाजांना एकही बळी मिळाला नाही. श्रेयस अय्यरने सर्वाधिक २१७ आणि लोकेश राहुलने २०४ धावा काढल्या.


सामन्यानंतर विराटची प्रतिक्रीया

आमच्या संघाची क्षेत्ररक्षण, गोलंदाजी झाली सुमार

संघाने यापूर्वी असे खराब प्रदर्शन केले नव्हते. आम्ही संधीचा फायदा घेऊ शकलो नाही, हेच पराभवाचे कारण ठरले. जर धावसंख्या पाहिली तर सामना एवढा खराब नव्हता. फलंदाजांनी कठीण परिस्थितीत चांगले पुनरागमन केले, जे आमच्यासाठी सकारात्मक राहिले. ज्या पद्धतीने आम्ही गोलंदाजी व क्षेत्ररक्षण केले, ते आमच्यासाठी निराशाजनक ठरले. अशा प्रदर्शनामुळे विजयाचा विचारही करू शकत नाही. आम्ही या मालिकेत विजयाचे हक्कदार राहू शकत नाही.

X
COMMENT